Aadhaar card correction | आधार कार्डमध्ये करा दुरुस्ती, तेही मोबाईल क्रमांकाशिवाय, कसं शक्य आहे? चला तर या चार स्टेप्स करा फॉलो

| Updated on: Aug 14, 2022 | 6:05 PM

Aadhaar card correction without mobile number | अधिकृत मोबाईल क्रमांक नाही तरी करायची आधार कार्डमध्ये दुरुस्ती? तर ही सोपी पद्धत येईल उपयोगी

Aadhaar card correction | आधार कार्डमध्ये करा दुरुस्ती, तेही मोबाईल क्रमांकाशिवाय, कसं शक्य आहे? चला तर या चार स्टेप्स करा फॉलो
अशी करा दुरुस्ती
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Aadhaar card correction without mobile number | अधिकृत मोबाईल क्रमांक (authentic mobile number) नाही तरी करायची आधार कार्डमध्ये दुरुस्ती? तुम्हाला ही गोष्ट कशी शक्य आहे असे वाटत असेल नाही का? पण काही स्टेप्स फॉलो केल्यातर अशी दुरुस्ती(Changes), आधारकार्डमधील माहिती अद्ययावत (Updating) करणे सोपे आहे. आधार कार्ड UIDAI द्वारे जारी केले जाते. UIDAI भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण होय. ही भारत सरकारची अधिकृत एजन्सी आहे. आधार कार्डमध्ये (Aadhaar Card) 12 अंकी विशिष्ट कोड असतो. त्या आधारे व्यक्तीची ओळख तयार होते. सध्या आधार हे सर्वात महत्वाचा दस्ताऐवज आहे. आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा आहे. आधार महत्त्वाचा आहे, पण याचा अर्थ असा नाही की पासपोर्ट, पॅन आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या इतर ओळखपत्रांचा काही उपयोग नाही. ही सर्व कागदपत्रे आधारइतकीच महत्त्वाची आहेत. जर आधार कार्डमध्ये दुरुस्ती करायची असल्यास ती कशी करता येईल ते पाहुयात.

त्रुटीची करा दुरुस्ती

इतर कार्डांप्रमाणेच आधार कार्ड तयार करताना चूक होते. छापण्यात चूक होते. तर कधी स्पेलिंग चुकते. ती दुरुस्त करणे आवश्यक आहे. चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जाता येते. अधिकृतपणे ऑनलाईन द्वारे काही ठिकाणी हे काम करण्यात येते. त्याठिकाणी ही दुरुस्ती करता येते. ही दुरुस्ती ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येते. परंतु, ज्यांच्याकडे कोणताही नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नाही, त्यांना आधार कार्डमध्ये दुरुस्ती करता येते. कारण ओटीपी जनरेट (OTP Generate) होणार नसल्याने हे आधार दुरुस्तीचे काम तुम्हाला ऑफलाईन करावे लागेल.

आधार मध्ये करा बदल

UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि लॉग इन करा. तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक केल्यावरच त्यात बदल करता येईल. तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवला नसेल, तर तो आधी नोंदवा. त्यासाठी अर्ज करा. 3-5 दिवसांत मोबाईल क्रमांक नोंदवला जातो. या मोबाईल क्रमांकावर OTP मिळतो. ज्याच्या मदतीने आधारमध्ये बदल करता येतो, अथवा ते अद्ययावत करता येते. तुम्ही ऑनलाइन सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल म्हणजेच SSUP ची मदत घेऊन आधारमध्ये जन्मतारीख दुरुस्त करू शकता. यासाठी देखील OTP पडताळणी आवश्यक आहे. पण त्यासाठी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. जर मोबाईल क्रमांक आधारशी नोंदणीकृत नसेल तर तुम्हाला आधार केंद्रावरच जावे लागेल.

हे सुद्धा वाचा

या स्टेप्स करा फॉलो

घराजवळील कोणत्याही आधार केंद्राला भेट द्या आणि आधार कार्ड दुरुस्ती फॉर्म घ्या

फॉर्म भरा आणि आधार कार्डची प्रत आणि पॅनकार्ड यांची सत्यप्रत जोडा

आधार केंद्रावर बायोमेट्रिक मशीनद्वारे तुमच्या अंगठ्याचा ठसा, रेटिना स्कॅन करा

आधार केंद्राचा ऑपरेटर तुम्हाला पोचपावती देईल

तुमचा मोबाईल क्रमांक 2-5 दिवसांत आधारशी लिंक केला जाईल

यांची दुरुस्ती ऑफलाईन करा

1 नाव
2 पत्ता
3 जन्मतारीख
4 लिंग
5 मोबाईल नंबर
6 ई -मेल आयडी