Latest Government IPO | LIC नंतर आता या सरकारी कंपनीत गुंतवणुकीची संधी, लवकरच IPO येणार बाजारात

| Updated on: Jul 30, 2022 | 11:23 AM

Latest Government IPO | आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या सरकारी कंपनीचा आयपीओ बाजारात लवकरच दाखल होत आहे. जाणून घेऊयात या आयपीओ विषयी.

Latest Government IPO | LIC नंतर आता या सरकारी कंपनीत गुंतवणुकीची संधी, लवकरच IPO येणार बाजारात
आणखी एका सरकारी कंपनीचा आयपीओ
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Latest Government IPO | आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एलआयसीनंतर (LIC) सरकार आणखी एक आयपीओ IPO बाजारात आणण्याची तयारी करत आहे. या आर्थिक वर्षाच्या(Fiscal Year) शेवटच्या तिमाहीत आयपीओच्या(IPO) माध्यमातून ईसीजीसी लिमिटेड (ECG Limited) या सरकारी कंपनीचा शेअर बाजारात सुचीबद्ध होत आहे. एलआयसीच्यावेळी सरकारने फार मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली होती. त्यामाध्यमातून कोट्यवधी रुपये जमा करण्याची सरकारीची मनिषा होती. परंतू, त्यामध्ये सरकारला म्हणावे तसे यश आले नाही. तर दुसरीकडे गुंतवणूकदारांची ही घोर निराशा झाली. त्यामुळे हात पोळलेले गुंतवणूकदारा या सरकारी कंपनीत कितपत गुंतवणूक वाढवतील ही शंका कायम आहे. असे असले तरी अनेक सरकारी कंपन्यांची कामगिरी दमदार आहे. त्यात ईसीजीसी लिमिटेडचाही सहभाग आहे. आता सरकार या कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात दाखल करण्याच्या विचारात आहे. या आर्थिक वर्षातच सरकार आयपीओ दाखल करणार आहे. या कंपनीची संपूर्ण मालकी सरकारची आहे. कंपनी निर्यातदारांना निर्यातीसाठी कर्ज जोखीम विमा आणि संबंधित सेवा प्रदान करते. त्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची आणखी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे

कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) एम सेंथिलनाथन यांनी या आयपीओचे (IPO) संकेत दिले आहेत. सेंथिलनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) आयपीओनंतर ईसीजीसीची शेअर बाजारात सुचीबद्ध होणार असल्याची माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (DIPAM) दिली होती. शेअर बाजारात आयपीओ दाखल करण्यासाठीचा आढावा दिपम ने घेतला असून त्यांनी ईसीजीसी कंपनीला या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत बाजारात सुचीबद्ध करण्यासाठीचा कालावधी सांगितला आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनी काय करते?

आता ही कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करते ते पाहुयात. ईसीजीसी ही एक निर्यात कर्ज एजन्सी आहे. या कंपनीची संपूर्ण मालकी सरकारची आहे. कंपनी निर्यातदारांना निर्यातीसाठी कर्ज जोखीम विमा आणि संबंधित सेवा प्रदान करते.

गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ईसीजीसीने 6.18 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीला पाठिंबा दिला होता. 31 मार्चपर्यंत कंपनीला 6,700 हून अधिक विशेष निर्यातदारांना थेट संरक्षणाचा लाभ दिला आहे.बँकांसाठी एक्स्पोर्ट क्रेडिट इन्शुरन्स (ECIB) अंतर्गत 9,000 हून अधिक विशेष निर्यातदारांना फायदा झाला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी सुमारे 96 टक्के छोटे निर्यातदार आहेत. या कंपनीची मार्केट होल्ड खूप चांगली आहे. त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.