
ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आहे. फ्रेंडशिप डेनंतर आता प्रत्येक जण रक्षाबंधन सणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर सर्वांचा आवडता सण गणपती आहे… सध्या सर्वत्र गणपती सणाची लगबग सुरु झाली आहे. तर रक्षाबंधनपासून गणपतीपर्यंत… ऑगस्ट महिन्यात कोणते खास दिवस आहेत ते जाणून घेऊ… ज्यामुळे तुम्ही काही खास प्लॅन देखील करु शकता… ऑगस्ट महिन्यात अनेक खास दिवस आहेत…
7 ऑगस्ट – राष्ट्रीय हातमाग दिन
7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतातील पारंपारिक हातमाग उद्योग आणि कारागिरांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. यावेळी देश 7 वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करणार आहे.
9 ऑगस्ट – रक्षाबंधन
रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र बंधनाचा उत्सव आहे. बहीण तिच्या भावाला राखी बांधते आणि त्याला दीर्घायुष्याची शुभेच्छा देते. भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला भेटवस्तू देखील देतो.
10 ऑगस्ट – जागतिक सिंह दिन
दरवर्षी 10 ऑगस्ट हा दिवस जागतिक सिंह दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट सिंहांबद्दल आणि त्यांच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे.
12 ऑगस्ट – राष्ट्रीय युवा दिन (आंतरराष्ट्रीय युवा दिन)
12 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. हा दिवस तरुणांच्या विकास आणि संरक्षणासाठी समर्पित आहे.
15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. 1947 मध्ये याच दिवशी भारत ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला. यावर्षी देश आपला 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे.
16 ऑगस्ट – जन्माष्टमी
जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनी साजरा केला जातो. यावर्षी तो 16 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.
19 ऑगस्ट – जागतिक फोटोग्राफी दिन
19 ऑगस्ट हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फोटो आणि फोटोग्राफर यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा दिवस आहे.
20 ऑगस्ट – जागतिक डास दिन
20 ऑगस्ट रोजी जागतिक डास दिन साजरा केला जातो. मलेरिया आणि डेंग्यू सारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
23 ऑगस्ट – इस्रो दिन
23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले. त्यानंतर, पंतप्रधान मोदींनी 23 ऑगस्ट हा दिवस इस्रो दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
26 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय कुत्रा दिन
26 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय श्वान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट आश्रय शोधणाऱ्या आणि दत्तक घेण्याची वाट पाहणाऱ्या कुत्र्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे.
26 ऑगस्ट – हरितालिका
हिरतालिका भाद्रोपवी सुद तृतीयेला येते. या वर्षी ती 26 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. विवाहित महिला त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि अविवाहित मुली चांगल्या जीवनसाथीसाठी उपवास करतात.
26 – 27 ऑगस्ट – गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थी हा गणेशाच्या जन्मदिनी साजरा केला जातो. यावर्षी तो 26 आणि 27 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. हा उत्सव 10 दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर 2025 रोजी येईल.
29 ऑगस्ट – राष्ट्रीय क्रीडा दिन
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. हा दिवस खेळाचे आणि खेळाडूंचे महत्त्व पटवून देण्यासाठी साजरा केला जातो.