PHOTO: ATM मशीनमधून फाटलेली नोट मिळाली, कशी बदलून घ्याल?

| Updated on: Aug 28, 2021 | 7:58 AM

ATM Machine | अलीकडच्या काळात लोक बँकेत जाऊन पैसे काढण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट किंवा एटीएममधून पैसे काढण्याला प्रधान्य देतात. शहरी भागात अगदी प्रत्येक नाक्यावर एटीएम असल्यामुळे कधीही गरज लागल्यास एटीएममध्ये जाऊन पैसे काढता येतात.

1 / 5
एटीएम स्वॅप केले आणि पैसे निघाले नाहीत, तर बँक देणार भरपाई

2 / 5
अशावेळी फार बैचेन होण्याचे कारण नाही. तुम्ही अगदी सोप्या प्रक्रियेद्वारे फाटलेली नोट बदलून घेऊ शकता. कोणतीही बँक तुम्हाला फाटलेली नोट बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही.

3 / 5
फाटलेली नोट बदलण्यासाठी तुम्हाला एटीएमशी संबंधित बँकेत एक अर्ज द्यावा लागेल. त्यामध्ये पैसे काढल्याची तारीख, वेळ आणि एटीएमचा पत्ता नमूद करावा लागेल. यासोबत पैसे काढल्यानंतर एटीएममधून येणारी रिसीटही तुम्हाला जोडावी लागेल.

4 / 5
स्लीप जनरेट झाली नसेल तर तुम्हाला मोबाईलवर आलेल्या मेसेजची प्रिंटही देता येईल. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार कोणतीही बँक फाटलेली नोट बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही.

5 / 5
मध्यंतरी एका स्टेट बँकेच्या ग्राहकाने ट्विटरवर अशीच तक्रार केली होती. त्या ट्विटला स्टेट बँकेकडून उत्तर देण्यात आले होते. यामध्ये म्हटले होते की, आम्ही एटीएममध्ये पैसे लोड करण्यापूर्वी प्रत्येक नोटेची अत्याधुनिक सॉर्टिंग मशिनद्वारे तपासणी करतो. त्यामुळे स्टेट बँकेच्या एटीएममधून खराब झालेल्या किंवा फाटलेल्या नोटा बाहेर येणे अशक्य आहे. तरीही तुम्ही एसबीआयच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधून नोट बदलून घेऊ शकता.