IRCTC च्या वेबसाईटवर ‘ही’ ट्रिक वापरा, तत्काळ तिकीट नक्की मिळणार !

| Updated on: Jun 15, 2021 | 10:15 PM

तत्काळ तिकीट सुरु कधी होणार तसेच ते बूक कसे करायचे याची अनेकांना माहिती नसते. त्यामुळे प्रवसाला जाण्यापूर्वी चांगलीच धांदल उडते. याच कारणामुळे आम्ही तुम्हाला तत्काळ तिकीट बूक करण्यासाठी एक असा मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तिकीट निश्चितपणे मिळेल.

IRCTC च्या वेबसाईटवर ही ट्रिक वापरा, तत्काळ तिकीट नक्की मिळणार !
TRAIN
Follow us on

मुंबई : यात्रा करताना तिकीट बूक करायचे राहून गेले किंवा प्रवासाचे नियोजन उशिराने झाले तर आपल्याकडे तत्काळ तिकीट खऱेदी करणे हा एक सोपा उपाय असतो. मात्र, तत्काळ तिकीट बूक करायचे असेल तर त्याचे काही नियम आहेत. ट्रेन सुरु होण्याआधी एका निश्चित कालावधीमध्ये आपल्याला तत्काळ तिकीट बूक करता येते. मात्र, तत्काळ तिकीट सुरु कधी होणार तसेच ते बूक कसे करायचे याची अनेकांना माहिती नसते. त्यामुळे प्रवसाला जाण्यापूर्वी चांगलीच धांदल उडते. याच कारणामुळे आम्ही तुम्हाला तत्काळ तिकीट बूक करण्यासाठी एक असा मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तिकीट निश्चितपणे मिळेल. (book tatkal ticket online with the help of ask disha know all details)

तत्काळ तिकीट अनेकवेळा कन्फर्म का होत नाही ?

ऑनलाईन पद्धतीने आपण अनेकवेळा तत्काळ तिकीट बूक करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, लॉगिन करताच संपूर्ण तिकीट विकल्याचे आपल्याला समजते. योग्य वेळी तिकीट खरेदी न केल्यामुळे आपले तत्काळ तिकीट कन्फर्म होत नाही.

तत्काळ तिकीट कसे मिळवाल ?

तत्काळ तिकीट खरेदी करायचे असेल तर तुम्ही ज्या ट्रेनने जाणार आहात, त्या ट्रेनचा प्रवास कधी सुरु होणार आहे; याची माहिती असणे आवश्यक आहे. हे जाणून घेण्यासाठी IRCTC च्या वेबसाईटवर एक ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शनच्या मदतीने तत्काळ तिकीट बुकिंगविषयी माहिती मिळू शकते. या फिचरचे नाव Ask Disha असे आहे. Ask Disha या फिचरच्या मदतीने ट्रेनच्या तिकिटाची बुकिंग कधी सुरु होणार हे समजू शकते. या फिचरमध्ये प्रश्नाच्या माध्यमातून आपण सगळी माहिती विचारू शकतो. तिकीट बुकिंग कधी सुरु होणार हे समजल्यानंतर आपण लगेच तत्काळ तिकीट खरेदी करु शकतो.

Ask Disha काय आहे ?

Ask Disha एक चॅट बोर्ड आहे. यावर आपण आयआरसीटीसीला थेट प्रश्न विचारु शकतो. तुम्ही जर चॅटिंगमध्ये मेसेजच्या माध्यमातून प्रश्न विचारला तर तुम्हाला समोरून लगेच उत्तर मिळते. या फिचरच्या माध्यमातून तत्काळ तिकीट बुकिंग सुरु होण्याची वेळ समजल्यामुळे तुम्ही निश्चित वेळेत तिकीट खरेदी करु शकता.

Ask Disha चा उपयोग कसा करावा ?

आस्क दिशा या फिचरचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर वरती कॅटेगिरीमध्ये तुम्हाला Ask Disha हा ऑप्शन दिसेल. त्यानंतर Ask Disha वर क्लिक केल्यानंतर स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात चॅटिंग करण्यासाठी ऑप्सन दिसेल. या चॅटबॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. ज्या ट्रेनने प्रवास करायचा त्या ट्रेनच्या तत्काळ तिकिटाबद्दल या चॅटबॉक्सच्या माध्यमातून विचारता येते. त्यानंतर तुम्हाला लगेच समोरुन उत्तर येईल. तसेच या चॅटबॉक्समध्ये तुम्हाला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाशी संबंधित लिंकसुद्धा दिसू लागतील. अशा प्रकारे तिकीट खरेदी करण्यासाठीची वेळ तुम्हाला Ask Disha च्या माध्यमातून समजू शकेल आणि तुमच्या आधी कोणी तिकीट खरेदी करण्याऐवजी तुम्हीच तिकीट खरेदी करु शकता.

इतर बातम्या :

सोन्यावर Hallmarking बंधनकारक, या ॲपच्या मदतीने जाणून घ्या सोनं खरं की खोटं?

LIC च्या ‘या’ पॉलिसीत 150 रुपये गुंतवत राहा; नोकरीला लागण्यापूर्वीच तुमचं मूल होईल लखपती

PAN Aadhaar Linking: 30 जूनपर्यंत पॅनकार्ड आधारला लिंक न केल्यास होणार रद्द, भरावा लागणार दंड

book tatkal ticket online with the help of ask disha know all details