सोन्यावर Hallmarking बंधनकारक, या ॲपच्या मदतीने जाणून घ्या सोनं खरं की खोटं?

या नव्या नियमानुसार, आता 14, 18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असणे बंधनकारक असणार आहे. (BIS-Care app How To Use And More for verify the purity of Gold)

सोन्यावर Hallmarking बंधनकारक, या ॲपच्या मदतीने जाणून घ्या सोनं खरं की खोटं?
gold
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 2:58 PM

मुंबई : सोन्याचे दागिन्यांवर हॉलमार्किंग (Hallmark) असणे आजपासून बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाच्या अंमलबजावणी गेल्या 1 जूनपासून होणार होती. मात्र आता ही मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यानुसार आजपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. या नव्या नियमानुसार, आता 14, 18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असणे बंधनकारक असणार आहे. हा हॉलमार्क असल्यावरच त्याची विक्री करता येणार आहे. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड आणि एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. (BIS-Care app How To Use And More for verify the purity of Gold)

भारतात सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र सोन्याच्या शुद्धतेवर नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात. सोने खरेदीवेळी अनेकांची गुणवत्तेत फसवणूकही केली जाते. त्यामुळे शुद्ध सोने कसं ओळखायचे असा अनेकांना प्रश्न पडतो. यामुळेच सरकारने एक मोबाईल ॲप सुरु केले आहे. यात तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

सोने किती शुद्ध ओळखण्यासाठी घ्या BIS ॲपची मदत

केंद्रीय ग्राहक आणि खाद्य मंत्रालयाने (Union Ministry of Consumer and Food) BIS – केअर मोबाईल ॲप सुरु केले आहे. या ॲपच्या मदतीने तुम्ही खरेदी केलेले सोने किती शुद्ध आहे, याची माहिती सहज मिळू शकते. ISI गुणवत्ता आणि कोणत्याही उत्पादनाचे वैशिष्ट्य तपासण्यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.

बीआयएस ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे. बीआयएस-केअर ॲप वापरकर्त्यांना आयएसआय आणि हॉलमार्क गुणवत्ता-प्रमाणित असलेल्या उत्पादनांची गुणवत्ता तपासण्यास मदत करतो. तसेच जर ग्राहकाला भेसळयुक्त सोनं मिळालं तर तुम्ही BIS – केअर ॲपवर तक्रार नोंदवू शकता. याशिवाय या अ‍ॅपवर लायसन्स, नोंदणी आणि हॉलमार्कनंबर याविषयीही तक्रार दाखल करता येते. हे अ‍ॅप वापरण्यास सोपे असावे, यासाठी ते हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

?BIS-Care App – कसे कराल डाऊनलोड?

बीआयएस-केअर ॲप हे सध्या केवळ अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. हे Google Play Store वर उपलब्ध आहे. सद्यस्थितीत हे ॲप दहा हजारांहून अधिकांनी डाऊनलोड केलं आहे. चला तर जाणून घेऊ, तुम्ही हे ॲप कसे डाऊनलोड करु शकता?

?सर्वप्रथम Android युजर्सने Google Play Store वर जा.

?त्या ठिकाणी असलेल्या सर्च ऑप्शनमध्ये बीआयएस-केअर अ‍ॅप शोधा.

?ते ॲप दिसल्यानंतर त्यावर टॅप करुन Install या ऑप्शनवर क्लिक करा.

?बीआयएस-केअर ॲप हे वापरणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त एकदाच नोंदणी करावी लागते.

?ॲप डाऊनलोड झाल्यानंतर बीआयएस केअर ॲप ओपन करा

?तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी या सर्व गोष्टींची यात नोंद करा

?यानंतर ओटीपीद्वारे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफाय होईल.

?त्यानंतर तुम्ही हे ॲप वापरु शकता.

यानंतर तुम्ही सोन्याच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यास सुरुवात करु शकता. तसेच उत्पादनांची गुणवत्ता, ISI मार्कचा दुरुपयोग, हॉलमार्क इत्यादीबाबत तक्रारीही नोंदवू शकता. यात नोंदणी चिन्ह, दिशाभूल करणारी जाहिरात आणि बीआयएसशी संबंधित इतर मुद्द्यांचा समावेश आहे. (BIS-Care app How To Use And More for verify the purity of Gold)

संबंधित बातम्या :

Gold Price: सोन्याची चमक फिकी पडली, उच्चांकी स्तरापेक्षा 8000 रुपयांनी स्वस्त

Gold Hallmarking: सोन्याची खरेदी करताय, आजपासून लागू होतोय ‘हा’ नवा नियम

धमाकेदार ऑफर! 7 लाखांची कार अवघ्या 40 हजारात खरेदीची संधी

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.