अक्षय तृतीयेला सोने खरेदी करत आहात? जाणून घ्या सोने खरेदीच्या विविध प्रकारांबाबत

| Updated on: May 03, 2022 | 12:03 PM

आज अक्षय तृतीया आहे, अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र अनेकांना सोने खरेदीचा एकच मार्ग माहित असतो तो म्हणजे प्रत्यक्षात सोन्याची खरेदी. मात्र सोने खरेदीचे इतर देखील अनेक मार्ग आहेत. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

अक्षय तृतीयेला सोने खरेदी करत आहात? जाणून घ्या सोने खरेदीच्या विविध प्रकारांबाबत
Follow us on

आज अक्षय तृतीया आहे (akshaya tritiya) अक्षय तृतीया हा भारतामधील मोठा सण आहे. अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त माणण्यात येते. या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सराफा बाजारामध्ये मोठी उलाढल असते. कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची (Gold) खरेदी विक्री होते. मात्र अनेकांना सोने खरेदीचा एकच मार्ग माहित असतो, तो म्हणजे फिजिकल गोल्ड (Physical Gold) किंवा प्रत्यक्षात सोने खरेदी. या वेतिरिक्त देखील सोने खरेदीचे अनेक मार्ग आहेत. या मार्गांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. फिजिकल किंवा प्रत्यक्ष सोने खरेदीचे अनेक तोटे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षा तुम्ही जर प्रत्यक्ष सोन्याची खरेदी केली तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावर येते. तसेच अनेकदा फसवणूक होण्याची देखील शक्यता असते. मात्र सोन्याच्या इतर खरेदी प्रकारात ही जोखीम काहीसी कमी होते.

गोल्ड ईटीएफ

तुम्ही जर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही ऑनलाइन गोल्ड ईटीएफ माध्यमातून देखील सोने खरेदी करू शकता. मात्र यासाठी तुमच्याकडे डीमॅट खाते असणे गरजेचे असते. गोल्ड ईटीएफ किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही सोन्याची सोप्या पद्धतीने खरेदी विक्री करू शकता. तसेच तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.

गोल्ड म्युच्युअल फंड

गोल्ड फंड हा एक प्रकारचा म्युच्युअल फंडच असतो. तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून, प्रत्यक्षात सोने खरेदी करण्याच्या धोक्यापासून वाचू शकतात. तुम्ही एखाद्या बँकेत, गुंतवणूकदार एजेंट किंवा म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर जाऊन गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. सोन्याच्या दरामध्ये जसा बदल होतो, त्या बदलाच्या आधारावर तुम्हाला म्युच्युअल फंडमधून परतावा मिळतो.

डिजिटल गोल्ड

सोन्यात गुंतवणूक करण्याचा डिजिटल गोल्ड हा देखील एक उत्तम पर्याय आहे. अनेक कंपन्या, एमएमटीसी-पीएएमपी किंवा सेफगोल्डसोबत टायप करून आपल्या सोन्याची ऑनलाईन विक्री करतात. तुम्ही युपीआयच्या माध्यमातून डिजिटल गोल्ड खरेदी करु शकता. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही या सोन्याची विक्री करू शकता.

प्रत्यक्ष सोने

प्रत्यक्ष सोने अथवा फिजिकल गोल्ड हा सोने खरेदीचा असा प्रकार आहे की, ज्यामध्ये तुम्ही सराफा बाजारात जावून प्रत्यक्ष सोन्याची खरेदी करतात. प्रत्यक्ष सोने खरेदीचे अनेक तोटे आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षेचा मुद्दा आहे. तुमच्याकडे सोने असेल तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची असते. सोबतच प्रत्यक्षात सोने खरेदी करताना ते खूप काळजीपूर्वक खरेदी करावे लागते, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.