EPFO Alert: नोकरी सोडल्यानंतर घरबसल्या ईपीएफओला तारीख अपडेट कशी कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

| Updated on: Nov 04, 2021 | 8:24 AM

एम्प्लॉयरकडून बाहेर पडण्याची तारीख अपडेट न केल्यामुळे ईपीएफमधून पैसे काढणे किंवा ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया होत नाही. परंतु आता कर्मचार्‍यांना EPFO ​​सिस्टीममध्ये बाहेर पडण्याची तारीख टाकण्यासाठी देण्यात आलेल्या नवीन सुविधेमुळे फंडातून पैसे काढणे किंवा हस्तांतरित करणे सोपे झाले आहे.

EPFO Alert: नोकरी सोडल्यानंतर घरबसल्या ईपीएफओला तारीख अपडेट कशी कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
ईपीएफओ
Follow us on

नवी दिल्ली: जर तुम्ही नोकरी करत असाल आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे सदस्य असाल तर तुम्ही अनेक सुविधांचा ऑनलाइन लाभ घेऊ शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या ग्राहकांना अनेक सेवा ऑनलाइन पुरवते. तुम्ही तुमची नोकरी बदलली असेल, तर तुम्ही घरी बसून नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करू शकता.

नोकरी सोडल्याची तारीख अपडेट करणे का गरजेचे?

एम्प्लॉयरकडून बाहेर पडण्याची तारीख अपडेट न केल्यामुळे ईपीएफमधून पैसे काढणे किंवा ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया होत नाही. परंतु आता कर्मचार्‍यांना EPFO ​​सिस्टीममध्ये बाहेर पडण्याची तारीख टाकण्यासाठी देण्यात आलेल्या नवीन सुविधेमुळे फंडातून पैसे काढणे किंवा हस्तांतरित करणे सोपे झाले आहे.

जर तुम्हाला EPFO ​​खात्यात तुमचे नाव आणि जन्मतारीख बदलायची असेल, तर तुम्ही हे काम ऑनलाइन करू शकता. काही वेळा काही चुकीमुळे EPFO ​​खात्यात नाव किंवा जन्मतारीख चुकीच्या पद्धतीने अपडेट होते. त्यामुळे तुम्ही ते बदलू शकता. ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, सदस्य युनिफाइड पोर्टलवर जाऊन त्यांची चूक सुधारू शकतात. यासाठी तुम्हाला कुठेही धावण्याची गरज नाही. आपण ते सहजपणे ऑनलाइन करू शकता.

नोकरी सोडल्याची तारीख कशी अपडेट कराल?

* प्रथम, युनिफाइड सदस्य पोर्टलवर जा. त्यासाठी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर क्लिक करावे लागेल.
* यानंतर, UAN नंबर आणि पासवर्ड टाका आणि त्यावर क्लिक करा.
* तेथे मॅनेज ऑप्शनवर जा आणि मार्क एक्झिट वर क्लिक करा. त्यानंतर ड्रॉप डाउनमधील सिलेक्ट एम्प्लॉयमेंटमधून पीएफ खाते क्रमांक निवडा.
* आता बाहेर पडण्याची तारीख आणि बाहेर पडण्याचे कारण प्रविष्ट करा.
* त्यानंतर Request OTP वर क्लिक करा. आता तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP टाका.
* यानंतर, चेक बॉक्स निवडावा लागेल.
* आता Update पर्यायावर क्लिक करा आणि नंतर, शेवटी, OK.
* आता तुमची बाहेर पडण्याची तारीख अपडेट झाली असेल.

संबंधित बातम्या:

Petrol Diesel Price: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचा दर

पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात का, जाणून घ्या सर्वकाही

शेतकऱ्यांना आता विनातारण 1.60 लाखांचे कर्ज मिळणार, जाणून घ्या सर्वकाही