
आता 31 मार्चच्या अगोदर तुमच्या प्रोव्हिडंट फंडात (Providend Fund) कुुटुंबातील सदस्याची वारसदार (Nominee) म्हणून नोंद करणे आवश्यक आहे. यापूर्वी दोन वेळा वारस नोंदणीला मुदत वाढ देण्यात आली होती. आता वारददाराची नोंद न केल्यास पुन्हा संधी देण्यात येणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई-नॉमिनेशनसाठी (E-Nomination) 31 मार्च ही शेवटची तारीख ठेवली आहे. जर खातेदाराने ही संधी गमावली तर त्याला अनेक महत्वाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागेल.
ईपीएफ खाते ज्या उद्देशाने सुरु करण्यात आले आहे. तोच उद्देश पूर्ण होत नसेल तर त्याचा फायदा काय. त्यामुळे तुम्ही मुदतीपूर्वीच म्हणजे 31 मार्चपूर्वीच तुमच्या खात्यात ई-नॉमिनेशन पूर्ण करा. ई-नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण न केल्यास काय नुकसान होऊ शकते, याची माहिती ईपीएफओने दिली आहे. ई-नॉमिनेशन करतात, त्याची प्रक्रिया काय आहे, याची माहिती आणि ई-नॉमिनेशन न केल्यास काय नुकसान होऊ शकते, याची माहिती आपण घेऊयात.
वारसदार जोडण्याची प्रक्रिया
चला तर आता नुकसान काय होईल ते पाहुयात…
EPFO नुसार, तुम्ही वारसदाराचे नाव जोडले नसेल तर पीएफ रक्कम खात्यात अडकू शकते
खातेदाराने ई-नॉमिनेशन फॉर्म भरला नसेल तर खातेधारक पीएफ खात्यातून रक्कम काढू शकणार नाही.
दावा दाखल करण्यापूर्वी ई-नॉमिनेशन करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास दाव्याचा ही निपटारा (Claim Settlement) होणार नाही.
आणि मग वकिलाची मदत घेऊन न्यायालयात दावा दाखल करावा लागेल. त्यात पैसा आणि वेळ वाया जाईल आणि मनस्ताप होईल तो वेगळा.
खात्यातील शिल्लकी तपासता येणार नाही
ई-नॉमिनेशन न केल्यास पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची गोष्ट दूरच राहिली, तुम्हाला पासबूकमध्ये किती रक्कम शिल्लक आहे, हे तपासता येणार नाही. पीएफ खात्याचे विवरणपत्र बघता येणार नाही. त्यामुळे 31 मार्चपूर्वी तुम्ही ई-नॉमिनेशन पूर्ण करुन घ्या.
संबंधित बातम्या :
Bank holidays : बँकांशी संबंधित कामे पटापट पूर्ण करा; एप्रिल महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुटी