फेडरल बँकेकडून तीन नव्या श्रेणीतील क्रेडिट कार्डस् लाँच, ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणि डिस्काऊंट

| Updated on: Sep 05, 2021 | 10:48 AM

कार्डच्या तीन प्रकारांना सेलेस्टा, इम्पेरिओ आणि सिग्नेट असे नाव देण्यात आले आहे आणि प्रत्येक कार्ड विविध प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. | Credit Card

फेडरल बँकेकडून तीन नव्या श्रेणीतील क्रेडिट कार्डस् लाँच, ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणि डिस्काऊंट
फेडरल बँक
Follow us on

मुंबई: फेडरल बँकेने, डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक अग्रणी असलेल्या, व्हिसाच्या सहकार्याने आपले क्रेडिट कार्ड लाँच करण्यात आले आहे. तीन प्रकारांमध्ये आलेले हे कार्ड अनेक आकर्षक ऑफर्ससह पॅकेज केलेले आहे आणि सध्या बँकेच्या विद्यमान ग्राहकांना दिले जात आहे. या उत्पादनाचे सादरीकरण बँकेने देऊ केलेल्या बँकिंग उत्पादनांचा संच पूर्ण करते आणि बँकेच्या असुरक्षित, उच्च उत्पन्न देणारी उत्पादने देण्याची क्षमता सुधारण्याच्या धोरणाशी देखील जुळते.

कार्डच्या तीन प्रकारांना सेलेस्टा, इम्पेरिओ आणि सिग्नेट असे नाव देण्यात आले आहे आणि प्रत्येक कार्ड विविध प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. सेलेस्टा कार्ड एचएनआय ग्राहकांसाठी, इम्पेरिओ हे कुटुंबाभिमुख ग्राहकांसाठी आणि सिग्नेट हे तरुण व्यावसायिकां कडे केंद्रित आहेत. ग्राहकांना उद्योगातील सर्वोत्तम सुविधांसह सुसज्ज करण्यासाठी, बँक त्यांना सर्वात कमी वार्षिक टक्केवारी दरांसह क्रेडिट कार्ड ऑफर करणार आहे.

क्रेडिट कार्ड घेणाऱ्या ग्राहकांना खास सुविधा

कार्ड घेणाऱ्या ग्राहकांसाठी कैक स्वागतार्थ लाभ जसे अमेझॉन गिफ्ट व्हाउचर्स, आकर्षक रिवॉर्ड पॉइंट्स, आयनॉक्समध्ये बाय-वन-गेट-वन-फ्री ऑफर, मोफत सदस्यता कार्यक्रम, उत्कृष्ट रेस्टॉरंट्स मध्ये जेवणावर किमान १५% सूट, संपूर्ण भारतातील सर्व पेट्रोल पम्पसवर १% इंधन अधिभार माफी, विमानतळांवर प्रशस्त लाउंज प्रवेश सारख्या आणखी खूप विशेष ऑफर देखील आहेत.

क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी, बँकेने ‘डिजिटल फर्स्ट’ कार्ड दृष्टिकोन अमलात आणून, ३ क्लिक पध्दतीद्वारे त्वरित क्रेडिट कार्ड जारी करायची सुविधा उपलब्ध केली आहे. हे कार्ड बँकेच्या मोबाईल बँकिंग अनुप्रयोग ‘फेडमोबाइल’ मध्ये वापरण्यासाठी त्वरित उपलब्ध आहे आणि प्रत्यक्ष कार्ड काही दिवसात दिले जाईल. बँक लवकरच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय – NPCI) च्या सहकार्याने रुपे क्रेडिट कार्डचे सादर करण्याच्या मार्गावर आहे.

आमचे क्रेडिट कार्ड ३-क्लिक एप्लिकेशन पध्दतीसह पूर्णपणे डिजिटल आहे आणि आमच्या मोबाईल बँकिंग एप्लिकेशन फेडमोबाईलवर त्वरित वापरण्यासाठी उपलब्ध होईल. आम्हाला आनंद आहे की आम्ही ही डिजिटल झेप घेऊ शकलो आणि ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेनुसार सुविधा देऊ शकलो. व्हिसासह भागीदारीत ग्राहकांना आमचे क्रेडिट कार्ड सादर करण्यात आम्हाला आनंद होत आहे, असे फेडर बँकेचे सीईओ श्याम श्रीनिवासन यांनी म्हटले.

साधारणतः ज्यास्त किमतीच्या खरेदीचे नियोजन करताना ग्राहक बऱ्याचदा क्रेडिट कार्डकडे वळतात परंतु अलीकडे, आम्ही हा वापर अधिक विभाजनांमध्ये, भौगोलिक क्षेत्रात आणि श्रेणींमध्ये वाढलेला पाहिला आहे. फेडरल बँकेसोबत भागीदारी करण्यात आणि बँकेच्या विविध प्रकारच्या ग्राहकांना त्यांच्या गरजांप्रमाणे क्रेडिट कार्ड सेवा विस्तारित करण्यात आम्हाला आनंद होत आहे. देशात क्रेडिट कार्डांची संख्या सध्या क्रेडिट पात्र ग्राहकांच्या तुलनेत खूपच कमी असल्याने, आम्ही अशा भागीदारीद्वारे बँकासोबत भागीदारी करण्याची आणि ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरण्याची सुविधा आणि फायदे देण्याची मोठी संधी पाहात असल्याचे बँकेचे भारत आणि दक्षिण आशियाचे ग्रुप कंट्री मॅनेजर टी आर रामचंद्रन यांनी सांगितले.