हॉटेल रूममध्ये हिडन कॅमेरा शोधायचा कसा? या सोप्या ट्रिक्स करतील मदत

हॉटेलमध्ये पार्टनरसह मुक्काम करताना प्रायव्हसीची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हॉटेलच्या रूममध्ये हिडन कॅमेरा तर नाही ना, याची खात्री करण्यासाठी काही सोप्या पद्धतींचा वापर करता येतो.

हॉटेल रूममध्ये हिडन कॅमेरा शोधायचा कसा? या सोप्या ट्रिक्स करतील मदत
hidden hotel camera
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 30, 2026 | 7:53 PM

हॉटेलमध्ये मुक्काम करताना आरामदायी वातावरणासोबतच आपल्या गोपनीयतेची आणि सुरक्षिततेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. विशेषतः पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये राहताना खोलीत कोणतेही संशयास्पद उपकरण किंवा हिडन कॅमेरा तर नाही ना, याची खात्री करून घेणे गरजेचे ठरते. हिडन कॅमेरे आकाराने लहान असल्याने ते सहज लक्षात येत नाहीत, त्यामुळे रूममध्ये शिफ्ट होण्यापूर्वी काही प्राथमिक तपासणी करता येते. यासाठी मोबाईलचा फ्लॅश, कॅमेरा आणि Bluetooth यांसारख्या सुविधांचा वापर करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स आहेत. हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर लगेच सामान व्यवस्थित ठेवण्यापूर्वी खोलीची एकदा पाहणी केल्यास कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्याकडे वेळीच लक्ष देता येते.

खोलीत गेल्यानंतर आधी अंधार करा

हॉटेलची रूम मिळाल्यानंतर सर्वप्रथम खोलीतील हिडन कॅमेरा शोधण्याचा प्रयत्न करा. यासाठी खोलीतील सर्व लाइट बंद करा. तसेच खिडक्या, दरवाजे आणि पडदे बंद करून खोलीत शक्य तितका अंधार करा. त्यानंतर मोबाईलचे फ्लॅश लाइट सुरू करून खोलीच्या सर्व बाजू नीट तपासा. एखादा हिडन कॅमेरा असल्यास त्यावरील लेन्स किंवा प्रकाश फ्लॅशमध्ये दिसू शकतो. त्यामुळे खोलीतील वस्तू तपासताना विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. खोलीतील इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा सजावटीच्या वस्तूंकडेही काळजीपूर्वक पाहा.

Loading...

मोबाईलच्या कॅमेऱ्यानेही तपासा

आजकाल हिडन कॅमेरे आकाराने खूप छोटे असू शकतात. त्यामुळे ते सहज नजरेस पडतीलच असे नाही. अशावेळी मोबाईलचा कॅमेरा ऑन करून खोलीतील वस्तू तपासता येतात. मोबाईलच्या कॅमेऱ्यातून खोलीतील विविध वस्तू आणि भाग पाहता येतात. कुठे एखादा छोटा डॉट, लेन्स किंवा संशयास्पद खूण दिसल्यास त्याबाबत तातडीने हॉटेल मॅनेजरकडे विचारणा करावी. एखादी वस्तू नेमकी कशासाठी आहे, याबाबत शंका असल्यास हॉटेल कर्मचाऱ्यांकडून त्याची माहिती घेता येते.

मोबाईलचे ब्ल्यूटूथ ऑन करा

हिडन कॅमेरा शोधण्यासाठी मोबाईलचे Bluetooth ऑन करून तपासता येते. रिपोर्टनुसार, काही हिडन कॅमेरे ब्ल्यूटूथच्या माध्यमातून ऑपरेट केले जाऊ शकतात. त्यामुळे हॉटेलच्या खोलीबाबत किंचितही संशय असल्यास मोबाईलचे ब्ल्यूटूथ सुरू करून तपासणी करावी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us