Gold : 1 जूनपासून ग्राहकांना मिऴणार सोन्याच्या शुद्धतेची हमी; सोने खरेदी-विक्रीचे नियम बदलणार, गोल्ड हॉलमार्किंग सक्तीचे !

| Updated on: May 01, 2022 | 2:49 PM

सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा 1 जूनपासून सुरू होत आहे. गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा 1 जून 2022 पासून सुरू होत आहे. सरकारने 32 नवीन जिल्ह्यांमध्ये ते अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

Gold : 1 जूनपासून ग्राहकांना मिऴणार सोन्याच्या शुद्धतेची हमी; सोने खरेदी-विक्रीचे नियम बदलणार, गोल्ड हॉलमार्किंग सक्तीचे !
सोन्या, चांदीचे आजचे दर
Follow us on

मुंबई : गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा दुसरा टप्पा १ जून २०२२ पासून सुरू होत आहे. सरकारने शनिवारी सांगितले की, सोन्याचे दागिने आणि कलाकृतींच्या अनिवार्य हॉलमार्किंगचा (Mandatory hallmarking) दुसरा टप्पा यावर्षी १ जूनपासून सुरू होईल. 2021 मध्ये, सरकारने सुवर्ण हॉलमार्किंगचा पहिला टप्पा लागू केला. 1 जून 2021 रोजी त्याची अंमलबजावणी झाली तेव्हा 256 जिल्ह्यांमध्ये त्याची सुरुवात झाली. सध्या इतर शहरांसाठी हे बंधनकारक नाही. हॉलमार्किंग प्रणाली ही महागड्या धातूंसाठी शुद्धता प्रमाणपत्र (Certificate of accuracy) असते. ज्या जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे, तेथील ज्वेलर्स हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाहीत. दुसऱ्या टप्प्यात ३२ नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात येत असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून (Ministry of Consumer Affairs) सांगण्यात आले आहे.

32 जिल्ह्यांमध्ये लागू

हॉलमार्क सोन्यात, तीन महत्त्वाचे कॅरेट (20, 23 आणि 24 कॅरेट) समाविष्ट केले जातील जे सोन्याचे दागिने आणि कलाकृतींना लागू आहेत. दुसऱ्या टप्प्यांतर्गत, 32 जिल्ह्यांमध्ये AHC म्हणजेच Assaying आणि Hallmarking केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रतिदिन ३ लाख दागिन्यांवर हॉलमार्किंग केले जात आहे भारतीय मानक ब्युरो (BIS) ने २३ जून २०२१ पासून देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये सोन्याचे अनिवार्य हॉलमार्किंग यशस्वीरित्या लागू केले आहे.

3 लाखाहून अधिक सोन्यावर हॉलमार्किंग

जेथे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (एचयूआयडी) सह ३ लाखांहून अधिक सोने दागिन्यांवर हे हॉलमार्किंग केले जात आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, BIS च्या तरतुदीनुसार, सामान्य ग्राहक BIS द्वारे मान्यताप्राप्त AHC मध्ये सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता देखील तपासू शकतो. जर तुम्ही BIS द्वारे मान्यताप्राप्त हॉलमार्किंग केंद्रात गेलात, तर 4 अ आर्टीकलवर हॉलमार्क लावण्यासाठी 200 रुपये आकारले जातात. त्यापेक्षा जास्त दागिने असल्यास प्रति आर्टीकल ४५ रुपये शुल्क आकारले जाते.

हे सुद्धा वाचा

BIS नोंदणीकृत ज्वेलर्सकडे हॉलमार्किंग सुविधा

ग्राहक व्यवहार विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, तुमच्या जुन्या दागिन्यांवर हॉलमार्क नसल्यास, कोणत्याही BIS नोंदणीकृत ज्वेलर्सला भेट देऊन हे काम केले जाऊ शकते. तुम्ही तुमचे दागिने ज्वेलर्सकडे जमा करता तेव्हा तो ते बीआयएस हॉलमार्किंग सेंटरमध्ये घेऊन जातो. यासाठी तो एका दागिन्यासाठी ३५ रुपये आकारतो. बीआयएस वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, केवळ नोंदणीकृत ज्वेलर्सच असेयिंग आणि हॉलमार्किंग सेंटरला भेट देऊ शकतात.