Gold Price: संकटात संधी, नव्या वर्षात सोने झळकणार, 55 हजारांच्या पुढे दर जण्याचा तज्ज्ञांचा अंदाज!

| Updated on: Dec 31, 2021 | 9:50 AM

आता आगामी वर्षात सोन्याच्या भावांतील ही मरगळ झटकली जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 2022 मध्ये सोने 55 हजारांच्या पातळीपुढे जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Gold Price: संकटात संधी, नव्या वर्षात सोने झळकणार, 55 हजारांच्या पुढे दर जण्याचा तज्ज्ञांचा अंदाज!
सोन्याच्या भावात पडझड, चांदी गडगडली
Follow us on

मुंबईः 2021 हे वर्ष कोरोना संकट आणि त्यामुळे उभ्या राहिलेल्या आर्थिक, आरोग्यविषयक अडचणींमुळे कठीण गेले. भारतीय बाजारावरही त्याचा परिणाम झाला. मागील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सोन्याचे उच्चांक गाठला होता तर त्यानंतरच्या सहामाहीत सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. आता आगामी वर्षात सोन्याच्या भावांतील ही मरगळ झटकली जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 2022 मध्ये सोने 55 हजारांच्या पातळीपुढे जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

सोन्याच्या आगामी वाटचालीविषयी बोलताना कॉमट्रेन्ड्झचे सह संस्थापक व सीईओ ज्ञानेशेखर त्यागराजन म्हणाले, मागील वर्षात शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली. त्यामुळे भांडवली गुंतवणुकीकडे बाजार आकर्षित झाला. परिणामी दुसऱ्या सहामाहीत सोन्याच्या मागणीत काहीशी घट दिसून आली. अमेरिकेतही ओमिक्रॉनचे संकट पाहता नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशा स्थितीत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने दरकपात केल्यास डॉलरचे महत्त्व वाढणार आहे. तरीही सोन्याकडे गुंतवणूकदार वळू शकतील. कारण जगभरात चलनवाढीचा धोका निर्माण झाल्याने लोक सोन्यात पैसा गुंतवून तो सुरक्षित करण्यावर भर देत असतात. शेअर बाजारातील चढउतार व राजकीय अस्थिरता आल्यासदेखील सोन्याचे भाव वाढू शकतात.

पुढील वर्षात 55 हजारांपुढे जाणार

तज्ज्ञांच्या मते, आगामी वर्षात सोने 55 हजार रुपयांपर्यंत जाईल. यापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये सोन्याच्या भावाने एमसीएक्स वायदेबाजारात 56,200 रुपये एवढा उच्चांक गाठला होता. सध्या एक तोळा सोन्याचा दर 48,000 रुपयांच्या दरम्यान आहे. गुरुवारी दिवसअखेर सोन्याचा भाव 47,798 रुपये एवढा नोंदवला गेला. ऑगस्ट महिन्यातील उच्चांकीपेक्षा हा भाव 14 टक्क्यांनी कमी आहे. तसेच जानेवारी 2021 मधील सरासरी भावाच्या 4 टक्के कमी आहे.

इतर बातम्या-

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन अश्लील वर्तन, वसईत टवाळखोराला स्थानिकांनी चोपला

Skin Care : हिवाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ घरगुती पेयांचा आहारात समावेश करा!