Home Loan Tax Benefits : होम लोनवर टॅक्स वाचवण्याचे तीन सोपे उपाय, दीड लाखांपर्यंत होऊ शकतो फायदा

| Updated on: Mar 13, 2022 | 7:39 AM

तुम्हाला स्वस्त होम लोन सोबतच गृह कर्जावर कशापद्धतीने टॅक्स बचत होऊ शकते हे जर माहित असेल तर तुमचा दुप्पट फायदा होऊ शकतो. आज आपण टॅक्समध्ये कशापद्धतीने बचत करू शकतो याबाबत जाणून घेणार आहोत.

Home Loan Tax Benefits : होम लोनवर टॅक्स वाचवण्याचे तीन सोपे उपाय, दीड लाखांपर्यंत होऊ शकतो फायदा
गृह कर्ज घेताना तुम्हाला ‘या’ शुल्काबाबत माहिती हवीच
Follow us on

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोना संकट आहे. कोरोना काळात घर खरेदी विक्रीचे व्यवहार मंदावले होते. याचा फटका हा बँका तसेच घर खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या संस्थांना देखील बसला. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा एकदा उद्योग-धंदे पूर्वपदावर आले असून, रोजगारामध्ये वाढ झाली आहे. हाती पैसा आल्याने अनेक जण घरामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. दरम्यान घर खरेदीसाठी कर्ज (Home loan) उपलब्ध करून देण्यासाठी विविध बँका आणि कर्जपुरवठादार संस्थांमध्ये एक प्रकारची स्पर्धा लागल्याचे पहायला मिळत आहे. याचाच परिणाम म्हणजे घरासाठी मिळणाऱ्या कर्जावर व्याजदर (Home loan interest rate) कमी झाला आहे. अवघ्या सात टक्क्यांनी देखील तुम्हाला होमलोन उपलब्ध होऊ शकते. एकीकडे ग्राहकांना स्वस्तात गृहकर्ज उपलब्ध होत आहे. तर दुसरीकडे ग्राहक होम लोनवर मिळणाऱ्या कर बचतीचा (Home loan tax benefits) देखील विचार करत आहेत. जर तुम्हाला स्वस्त होम लोन सोबतच गृह कर्जावर कशापद्धतीने टॅक्स बचत होऊ शकते हे जर माहित असेल तर तुमचा दुप्पट फायदा होऊ शकतो. आज आपण टॅक्समध्ये कशापद्धतीने बचत करू शकतो याबाबत जाणून घेणार आहोत.

अशा प्रकारे वाचवा टॅक्स

तुम्ही होम लोन घेतल्यानंतर तीन पद्धतीने टॅक्समध्ये बचत करू शकता. जर एखाद्या व्यक्तीने गृहकर्जावर कर वाचवण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येक वर्षी 4 लाख रुपयांपेक्षा जास्त कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. याद्वारे तुम्ही दरवर्षी 1.30 लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवू शकता. आयकराच्या कलम 80C अंतर्गत, गृहकर्जाच्या मूळ पेमेंटवर कर कपातीचा लाभ उपलब्ध आहे. दुसरा मार्ग कलम 24B आहे ज्यामध्ये व्याजाच्या पैशावर कर कपात केली जाऊ शकते. तिसरी पद्धत कलम 80EEA ची आहे, ज्यामध्ये गृहकर्जाच्या अतिरिक्त व्याजावर कर बचतीचा लाभ उपलब्ध आहे

होम लोन घेताना काय काळजी घ्याल?

तुम्ही जर घर खरेदीसाठी होम लोन घेण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा गडबड करू नका. सर्वात आधी याचा शोध घ्या की तुम्हाला कोणत्या ठिकाणी स्वस्तात गृहकर्ज मिळत आहे. कारण सध्या बँका आणि वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये होम लोन देण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याचे पहायला मिळते. याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. चार ठिकाणी होम लोनची चौकशी करा जिथे स्वस्तात कर्ज उपलब्ध असेल तिथून तुम्ही कर्ज घेऊ शकता. कर्ज घेताना ते कमीत कमी कसे राहील याकडे देखील लक्ष द्या. म्हणजे तुम्ही जर काही बचत केली असेल तर ही बचत घर खरेदीसाठी तुम्ही वापरू शकता. याचा फायदा असा की, त्यामुळे तुम्हाला कमी गृहकर्ज घ्यावे लागेल आणि त्यामुळे तुम्हाला व्याजापोटी द्याव्या लागणाऱ्या पैशांमध्ये बचत होऊ शकते.

संबंधित बातम्या

आर्थिक अडचणीमध्ये गुंतवणुकीवर कर्ज घेणे कितपत फायदेशीर?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

तुम्हालाही ऑनलाईन कर्ज हवे आहे? मग ही फिनटेक कंपन्यांची ‘डिजिटल दादागिरी’ एकदा बघाच

RBI Alert : केंद्रीय बँकेच्या नावाने पैसे उकळणारी टोळी सक्रिय, ऑनलाईन फसवणुकीपासून कसे सावध राहाल?