रेशन कार्डवरील मोबाईल क्रमांक बदलायचाय, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

| Updated on: Sep 14, 2021 | 11:50 AM

Ration Card | तिसऱ्या रकान्यात घराच्या प्रमुखाचे नाव लिहावे लागेल. शेवटच्या रकान्यात तुम्हाला तुमचा नवीन मोबाईल नंबर लिहावा लागेल. आता Save वर क्लिक करा आता तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल. याशिवाय, तुमचे रेशनकार्ड आधारशी जोडलेले आहे का, याचीही खात्री करा.

रेशन कार्डवरील मोबाईल क्रमांक बदलायचाय, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
रेशन कार्ड
Follow us on

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुढील चार महिने म्हणजे नोव्हेंबरपर्यंत गरिबांना मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार, आता 5 किलो धान्य गरिबांना मोफत 5 किलो रेशनमध्ये दिले जात आहे. त्यामुळे रेशन कार्डला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आहे. जर तुमचा चुकीचा मोबाईल नंबर या कार्डावर टाकला गेला असेल किंवा जुना नंबर असेल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुमचा नंबर बंद झाल्यास किंवा बदलल्यास रेशन कार्डवर तो तात्काळ अपडेट करावा.

त्यासाठी दिल्ली सरकारने एक खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या संकेतस्थळावर जावे लागेल. तुमच्या समोर एक पेज उघडेल. येथे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट दिलेला दिसेल. आता खाली दिले आहे दिलेल्या स्तंभात, तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल. येथे पहिल्या रकान्यात तुम्हाला घराच्या प्रमुख / NFS आयडीचा आधार क्रमांक लिहावा लागेल. दुसऱ्या स्तंभात तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक लिहावा लागेल.

तिसऱ्या रकान्यात घराच्या प्रमुखाचे नाव लिहावे लागेल. शेवटच्या रकान्यात तुम्हाला तुमचा नवीन मोबाईल नंबर लिहावा लागेल. आता Save वर क्लिक करा आता तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल. याशिवाय, तुमचे रेशनकार्ड आधारशी जोडलेले आहे का, याचीही खात्री करा. देशभर पसरत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गेल्या वर्षी रेशन कार्डला आधारशी लिंक करणे सुरू केले. केंद्रीय अन्न मंत्रालयाने सांगितले आहे की जे रेशन कार्ड आधारशी लिंक करत नाहीत, त्यांना रेशन मिळण्यात अडचण येईल.

नवीन रेशनकार्डासाठी आता या कागदपत्रांची गरज लागणार

देशातील गरिबांसाठी प्रमुख आधार असलेले रेशनकार्ड तयार करण्याच्या नियमांत बदल झाले आहेत. त्यानुसार नवीन रेशनकार्ड तयार करण्यासाठी किंवा रेशनकार्डाचे नुतनीकरण करण्यासाठी 10 प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत.नव्या रेशनकार्डासाठी कुटुंबप्रमुखाचा एक पासपोर्ट साईज फोटो गरजेचा आहे. तुमच्याकडे जुनं रेशनकार्ड असेल तर ते रद्द झाल्याचे प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे. याशिवाय, कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्सही गरजेची आहे.

कुटुंबप्रमुखाच्या नावावर असलेल्या गॅस पासबुकची झेरॉक्स गरजेची आहे. तसेच संपूर्ण कुटुंबाच्या आधार कार्डाची फोटोकॉपी गरजेची आहे. कुटुंबातील सदस्यांचा जन्माचा दाखला, पॅनकार्ड आणि मतदार ओळखपत्र आता बंधनकारक आहे. रेशनकार्डासाठी अर्ज केलेल्या कुटुंबप्रमुखाच्या जातीचा दाखला आणि संबंधित कागदपत्रे गरजेची असतील. दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांचे प्रमाणपत्र जमा करावे लागेल.

कुटुंबप्रमुख मनरेगा जॉब कार्डधारक असेल त्याची फोटोकॉपी गरजेची आहे. उत्पन्नाच्या दाखल्याचा पुरावा बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच पत्त्याचा दाखला म्हणून लाईट बिल, घराच्या भाड्याची पावती किंवा अॅग्रीमेंट जमा करणे बंधनकारक आहे.

संबंधित बातम्या:

घरबसल्या रेशन कार्डावर जोडा नव्या सदस्याचं नाव, वाचा संपूर्ण प्रक्रिया

रेशन कार्ड तयार करायचेय, नियम बदलले, आता ‘या’ कागदपत्रांची गरज लागणार

तुमचं रेशन कार्ड आता एटीएम कार्डसारखं होणार!