पेट्रोल पंप कसा सुरू करावा? जाणून घ्या गुंतवणूक, अर्ज आणि इतर सर्व बाबी एका क्लिकवर

| Updated on: May 21, 2022 | 1:24 PM

हमखास चांगला परतावा मिळून देणारा व्यवसाय म्हणून पेट्रोल पंपाकडे पाहिले जाते. मात्र अनेकांना पेट्रोल पंप कसा सुरू करावा त्यासाठी गुंतवणूक किती करावी लागते याबद्द माहिती नसते आज आपण याबाबत जाणून घेणार आहोत.

पेट्रोल पंप कसा सुरू करावा? जाणून घ्या गुंतवणूक, अर्ज आणि इतर सर्व बाबी एका क्लिकवर
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : सर्वात फायदेशीर आणि जास्तीत जास्त पैसे मिळून देणारा उद्योग म्हणून पेट्रोल पंपाकडे (Petrol pump) पाहिले जाते. ज्या प्रमाणे अन्न, हवा, पाणी या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. तशीच सध्याच्या काळात इंधन (Fuel) देखील मानवाची मूलभूत गरज (Basic need) झाली आहे. पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनामुळे मानवाच्या जीवनाला गतिमानता आली आहे. इंधनाच्या उपलब्धतेमुळे मानव अवघ्या काही तासांमध्ये शेकडो किलोमिटरचा प्रवास करू शकतो. त्यामुळे पेट्रोल, डिझेल ही मानवाची एक मूलभूत गरज असल्याने दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या मागणीमध्ये वाढ होतच आहे. त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पेट्रोल पंप सुरू करू शकता. मात्र अनेकांना पेट्रोल पंप कसा सुरू करायचा याची माहितीची नसते. भारतात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी सरकारी तसेच खासगी पेट्रोलियम उत्पादक कंपन्यांकडून परवाना दिला जातो. त्यानंतर तुम्ही पेट्रोल पंप सुरू करू शकता. आज आपण या संपूर्ण प्रक्रियेविषयी जाणून घेणार आहोत.

पेट्रोल पंप कोण सुरू करू शकतो?

पेट्रोल पंप भारतातील कोणताही नागरिक सुरू करू शकतो. मात्र त्यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 21 व जास्तीत जास्त 55 वर्षांपर्यंत असावे. तो भारतीय नागरिक असावा या दोन प्रमुख अटी आहेत. भारतात एनआरआय देखील पेट्रोल पंप सुरू करू शकतो. मात्र त्यासाठी त्याला आधी कमीत कमी 182 दिवस भारतात राहाणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर कमीत कमी 12 वी पर्यंत शिक्षणाची अट आहे. तर शहरी भागात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी अर्जदार हा पदवीधर असावा.

15 लाखांत सुरू करू शकता पेट्रोल पंप

पेट्रोल पंप हा एक असा व्यवसाय आहे की तुम्ही एकदा हा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभरासाठी एक मजबूत उत्पन्नाचे साधन मिळते. पेट्रोल विक्रीतून तुम्ही चांगली कमाई करू शकता. मात्र अनेकांना यातील गुंतवणुकीची अचूक कल्पाना नसते. तुम्हाला ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करायचा असल्यास तुम्ही 15 लाखांची गुंतवणूक करून पेट्रोल पंप सुरू करू शकता. हाच पेट्रोल पंप तुम्हाला जर शहरी भागात सुरू करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी 30-35 लाखांच्या भाडंवलाची आवश्यकता असते. प्रतिंबंधित क्षेत्रात पेट्रोल पंप सुरू करता येत नाही. पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 800-1200 स्केअर फूट जमीनीची आवश्यकता असते.

हे सुद्धा वाचा

अर्ज कसा कराल?

पेट्रोलियम कंपन्यांकडून एका ठराविक कालावधीच्या अंतराने पेट्रोल पंप डीलरशिपसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जात असतात. या जाहिरातींचा संदर्भ घेऊन तुम्ही संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या साईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. एकाच क्षेत्रात पेट्रोल पंप उघडण्यासाठी एकापेक्षा अनेक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. त्यामध्ये ज्याचे नाव निघते त्याला पेट्रोल पंपाची डीलरशिप देण्यात येते. तुम्हाला पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन, महापालिका अथवा नगरपालिका आणि इतर काही संस्थांच्या एनओसीची गरज असते. ती सादर करताच तुम्हाला पेट्रोल पंपाची डीलरशिप मिळते.