तुम्हीही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही? मग पुढील महिन्यापासून अधिक टीडीएस देण्यास तयार रहा

| Updated on: Jun 26, 2021 | 7:49 PM

आयकर कायद्यांतर्गत, प्रत्येक वर्षी टीडीएसची रक्कम 50,000 पेक्षा कमी असेल किंवा गेल्या दोन वर्षांपासून करदात्यांनी आयकर विवरणपत्र भरले असेल तर हा नियम लागू होणार नाही. (If you are not file an income tax return, Then be prepared to pay more TDS from next month)

तुम्हीही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही? मग पुढील महिन्यापासून अधिक टीडीएस देण्यास तयार रहा
पगारावरील कर वाचविण्याचे 10 सोपे मार्ग, बंपर रिटर्नसह मिळेल सेवानिवृत्ती निधी
Follow us on

नवी दिल्ली : जर तुम्ही इनकम टॅक्‍स रिटर्न भरला नसेल तर 1 जुलैपासून अधिक कर टीडीएस (Tax Deducted at Source) भरण्यास तयार रहा. पुढील महिन्यापासून म्हणजे 1 जुलै 2021 पासून उशिरा आयकर परतावा भरणाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त टीडीएस भरावा लागेल. वित्त कायदा 2021 मध्ये यासाठी तरतूद आहे. अशा परिस्थितीत जर करदात्याने मागील दोन वर्षांत कोणताही आयटीआर सादर केलेला नसेल आणि दरवर्षी त्याचा टीडीएस 50,000 किंवा त्याहून अधिक कपात केला असेल तर 1 जुलैपासून आयकर विवरणपत्र भरताना कर विभाग अधिक शुल्क आकारेल. (If you are not file an income tax return, Then be prepared to pay more TDS from next month)

वास्तविक, यावेळी नवीन कलम 206AB ची तरतूद अर्थसंकल्पात आणली गेली आहे. त्याअंतर्गत, मागील दोन वर्षांत कोणताही आयकर विवरणपत्र न भरलेल्या आणि त्यांचे टीडीएस वर्षाकाठी 50 हजार किंवा त्याहून अधिक रकमेवर आयटीआर दाखल करताना आता त्या करदात्यांना टीडीएसचा उच्च दर भरावा लागेल.

टीडीएस कोणत्या दराने भरावा लागेल?

अशा करदात्यांसाठी टीडीएसचा नवीन दर दुप्पट किंवा 5% असेल. यापैकी जे दर सर्वात जास्त असतील तेवढाच दर लागू होईल. तथापि, ही तरतूद ज्या करांवर पूर्ण रक्कम कपात करणे अनिवार्य आहे अशा व्यवहारांना लागू होणार नाही. जसे की – पगाराचे उत्पन्न, अनिवासी किंवा लॉटरीचे पेमेंट इ.

नवीन टीडीएस नियम

– टीडीएसचे व्याज दर खाली दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असतील.
– आयकर कायद्यान्वये निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा दुप्पट किंवा
– सध्या लागू दरापेक्षा दुप्पट किंवा
– पाच टक्के दराने

कुठे लागू होणार नाही टीडीएसचा नवीन नियम?

आयकर कायद्यांतर्गत, प्रत्येक वर्षी टीडीएसची रक्कम 50,000 पेक्षा कमी असेल किंवा गेल्या दोन वर्षांपासून करदात्यांनी आयकर विवरणपत्र भरले असेल तर हा नियम लागू होणार नाही. आयकर कायद्यांतर्गत वेतन मिळकत (192), लॉटरी (194B), घुडदौड (194BB), पीएफ (192A), ट्रस्ट इनकम (194LBC) आणि रोख पैसे काढणे (194N)वर टीडीएस वजा केल्यास नवीन तरतुदी त्यांना लागू होणार नाही. याशिवाय कोणत्याही अनिवासी भारतीयांची भारतात कायमची स्थापना नसल्यास टीडीएसचा हा नवा नियम त्यांनाही लागू होणार नाही. (If you are not file an income tax return, Then be prepared to pay more TDS from next month)

इतर बातम्या

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आपलेही खाते आहे ? 4 दिवसांच्या आत पूर्ण करा हे काम, अन्यथा पेमेंट थांबेल

पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला सहजरित्या पेन्शन मिळणार, प्रक्रिया सोपी करा, सरकारचे बँकाना आदेश