नव्याने नोकरी करत असाल तर ITR फायलिंगबाबत या 5 गोष्टी समजून घ्या, कर्जापासून विजा मिळण्यासही मदत

| Updated on: Jun 17, 2021 | 5:55 AM

तुम्ही अलिकडेच पगारी झाला असाल आणि अजून तुम्हाला आयकर परतावा दाखल (Income tax return) करण्याबाबत माहिती नसेल तर काही गोष्टी माहिती करुन घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे.

नव्याने नोकरी करत असाल तर ITR फायलिंगबाबत या 5 गोष्टी समजून घ्या, कर्जापासून विजा मिळण्यासही मदत
income tax department
Follow us on

मुंबई : तुम्ही अलिकडेच पगारी झाला असाल आणि अजून तुम्हाला आयकर परतावा दाखल (Income tax return) करण्याबाबत माहिती नसेल तर काही गोष्टी माहिती करुन घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 आहे. टॅक्सबेल इनकम, 26AS, फॉर्म 16, टीडीएस आणि टॅक्स सेविंग इनवेस्टमेंट यासारखे शब्द नव्याने नोकरी करणाऱ्या तरुणांचा गोंधळ वाढवतात. मात्र, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. 5 गोष्टी समजून घेतल्या की हे सर्व सोपं आहे (Important 5 things about ITR filing Income tax return for new earners).

1. आयकर रिटर्न फायलिंग म्हणजे काय?

आर्थिक वर्ष (financial year) संपलं की तुम्हला मागील वर्षीच्या उत्पन्नाच्या गणनेसाठी (Calculation) 3-4 महिने दिले जातात. हा वेळी कर देण्यास पात्र उत्पन्न मोजणी आणि त्यानुसार कर देण्यासाठी असतो.

जर एखाद्या व्यक्तीचं निव्वळ उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्याच्यासाठी आयकर रिटर्न दाखल करावा लागतो. निव्वळ उत्पन्न म्हणजे सर्व प्रकारची कपात सोडून हातात आलेलं एकूण उत्पन्न. आयकर कायद्यात अनेक डिडक्शन आहेत. तुम्ही जितका त्याचा वापर करुन आपलं उत्पन्न कमी करता तितका तुम्हाला लागणारा कर कमी होतो. आयकर कलम 80 अंतर्गत 80 सी, 80 डी, 80 ई वगैरे नुसार डिडक्शन उपलब्ध आहे. त्यांचा उपयोग कर देणेदारी कमी करण्यासाठीच होतो.

2. कर्ज सहजपणे मंजूर होतं

कर्ज मंजुरीच्या फायद्यांबाबत CA आणि फिनटूचे (Fintoo) संस्थापक मनीष पी हिंगर म्हणतात, “तुम्ही भविष्यात गाडी असो की घर कोणतेही कर्ज घ्या, पण आयटीआर फायलिंग केल्याची पावती तुमच्यासाठी महत्त्वाचा दस्तावेज असतो. बँक तुम्हाला कर्ज देण्याआधी मागील 3 वर्षांची आयटीआर पावती मागते. तुम्ही ही पावती दिली तर तुमचं कर्ज लवकर मंजूर होतं.

3. विजा प्रोसेसिंग सोपं होतं

जर तुम्ही विजासाठी अर्ज केला असेल तर अनेक दुतावासांकडून मागील वर्षांची आयटीआर पावती मागितली जाते. कारण ते आयकर नियमांचे कठोर पालन करतात.

4. तोट्याला कॅरी फॉरवर्ड करणं सोपं करतं

जर तुम्ही शेयर किंवा म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्यात तुम्हाला तोटा झाला असेल तर तो तोटा पुढील वर्षात कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी निश्चित वेळेत इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणं आवश्यक आहे. कारण पुढील वर्षी जर नफा झाला तर आधीचा तोटा त्याला सामवून घेऊन करता सूट मिळते.

5. … अन्यथा 10 हजार दंड

तुमचं एका आर्थिक वर्षातील उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरी तुम्ही वरीलप्रमाणे आयटीआर फाईल करु शकता. याशिवाय इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणंही गरजेचं असल्याचं लक्षात ठेवा. जर असं केलं नाही तर 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. म्हणूनच हे दुर्लक्षित करु नका आणि वेळेत इनकम टॅक्स रिटर्न फाईल करा.

हेही वाचा :

Income Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…

Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक

परदेशात पैसे पाठवणाऱ्यांना मोठा दिलासा, 30 जूनपर्यंत बँकामध्ये ‘हे फॉर्म’ ऑफलाईन भरता येणार

व्हिडीओ पाहा :

Important 5 things about ITR filing Income tax return for new earners