Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक

Income Tax new portal | येत्या 22 तारखेला दिल्लीत ही बैठक पार पडेल. या बैठकीला काही करदाते, लेखापरीक्षकांची शीर्षस्थ संस्था ICAI, ऑडिटर्स आणि काही सल्लागार उपस्थित असतील. यावेळी इन्फोसिसचे अधिकारी त्यांच्या शंकांचे निरसन करतील.

Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक
नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 10:00 AM

नवी दिल्ली: आयकर विभागाच्या नव्या पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाचे अधिकारी लवकरच इन्फोसिस कंपनीशी बोलणी करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच आयकर विभागाचे (Income Tax) हे नवे पोर्टल सुरु झाले होते. मात्र, असंख्य त्रुटींमुळे करदात्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे करदात्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Income Tax new E Filing portal issue)

या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाने या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले आहे. येत्या 22 तारखेला दिल्लीत ही बैठक पार पडेल. या बैठकीला काही करदाते, लेखापरीक्षकांची शीर्षस्थ संस्था ICAI, ऑडिटर्स आणि काही सल्लागार उपस्थित असतील. यावेळी इन्फोसिसचे अधिकारी त्यांच्या शंकांचे निरसन करतील.

आयकर विभागाचे ई-फाईलिंग पोर्टल सुरु करताना मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, आठवडाभरातच या पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी उघड्या पडल्या होत्या. या पोर्टलवर लॉग इन करण्यापासून नोटिसला उत्तर देण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक दोष आहेत. त्यामुळे अर्थखात्याने या सगळ्याची गांभीर्याने दखल घेतली आहे.

इन्फोसिस कंपनीला देण्यात आले होते प्रोजेक्ट

मोदी सरकारने ई-फायलिंग पोर्टल तयार करण्याची जबाबदारी इन्फोसिस कंपनीकडे सोपवली होती. इन्कम टॅक्स रिटर्नच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी 63 दिवसांचा अवधी लागतो. ही प्रक्रिया एका दिवसात पार पाडण्यासाठी इन्फोसिसला या पोर्टलची जबाबदारी देण्यात आली होती.

7 जूनला सुरु झाले होते पोर्टल

www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पोर्टलवरील अनेक सुविधा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्याठिकाणी केवळ COMING SOON असा मेसेज दाखवला जात आहे.

निर्मला सीतारमण यांचा संताप

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन पोर्टल डाऊन झाल्याबद्दल संताप व्यक्त करत इन्फोसिसला जाब विचारला आहे. बहुप्रतिक्षित ई-फायलिंग पोर्टल 2.0 सोमवारी रात्री 20.45 वाजता लाँच केलं आहे. नव्या पोर्टलबद्दल अनेक अडचणी समरो आल्या आहेत. इन्फोसिस आणि नंदन निलेकणी तुमच्याकडून दिली जाणारी सेवा गुणवत्तापूर्ण असेल. तुम्ही आमच्या करदात्यांना निराश करणार नाही, अशी आशा देखील सीतारमण यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

इन्कम टॅक्स विभागाचं नव पोर्टल पहिल्या दिवशी डाऊन, निर्मला सीतारमण यांनी इन्फोसिसला विचारला जाब

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय, करसवलत मिळवण्यासाठी काय करायचं? वाचा सविस्तर

(Income Tax new E Filing portal issue)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.