अन्नाच्या नासाडीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर; …तर जगातील उपासमारीची समस्या तीन पटीने वाढणार, संयुक्त राष्ट्र संघाचा इशारा

| Updated on: Jun 18, 2022 | 8:53 AM

देशात अनेक गरीब देश आहेत, ज्या देशांमध्ये उपासमारीची समस्या तीव्र आहे. मात्र दुसरीकडे असे देखील काही देश आहेत, ज्या देशांमध्ये दररोज हजारो टन अन्नपदार्थ वाया जातात.

अन्नाच्या नासाडीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर; ...तर जगातील उपासमारीची समस्या तीन पटीने वाढणार, संयुक्त राष्ट्र संघाचा इशारा
Follow us on

मुंबई : देशात असे अनेक गरीब देश आहेत की, त्या देशातील लोकांना एकवेळचं जेवण (Meals) देखील पोटभर मिळत नाही. उपासमारी (Starvation) ही त्या देशातील सर्वात मोठी समस्या आहे. मात्र दुसरीकडे काही देशांमध्ये दररोज हजारो टन अन्न कचऱ्यात फेकले जाते. हा मोठा विरोधाभास आहे. एकट्या मुंबईमध्ये (Mumbai) दररोज तब्बल 69 लाख टन अन्न कचऱ्यात फेकले जाते. संपूर्ण भारताबाबत बोलयाचे झाल्यास भारतात दरवर्षी जेवढे धान्य पिकते त्याच्या 30 टक्के अन्नधान्याची नासाडी होते. असा दावा यूएनच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे. सोबतच या अहवालामध्ये असा देखील इशारा देण्यात आला आहे की, जर अन्नाची अशीच नासाडी सुरू राहीली तर 2050 पर्यंत उपासमारीची समस्या आजच्या तुलनेत तीन पटीने वाढू शकते.

धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी

अन्नधान्य नासाडीच्या बाबतीत जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. लग्न, वाढदिवस, वास्तूशांती, अशा विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाप्रसंगी भारतात लोकांना जेवणासाठी बोलावण्यात येते. त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्यात येतो. मात्र जेवणासाठी किती लोक येणार याचा अंदाज न घेतल्याने अनेकदा मोठ्याप्रमाणात अन्नपदार्थ वाया जातात. सोबतच आपन रोज जे अन्नपदार्थ बनवतो त्याची देखील मोठ्याप्रमाणात नासाडी होते. एकीकडे देशातील जवळपास वीस कोटींपेक्षा अधिक नागरिक रोज एक वेळंच जेवण करून दिवस काढत आहेत. तर दुसरीकडे मोठ्याप्रमाणात अन्न वाया जात आहे.

हे सुद्धा वाचा

संयुक्त राष्ट्राचा अहवाल काय सांगतो?

जगात दररोज किती अन्नाची नासाडी होते याबाबत नुकताच ‘संयुक्त राष्ट्रा’च्या वतीने एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार भारतात वर्षाकाठी एकूण तीस टक्के अन्नाची नासाडी होत असल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले आहे. भारतात लग्न आणि इतर धार्मिक समारंभांमध्ये वर्षाकाठी तब्बल 40 टक्के अन्नाची नासाडी होत असल्याचा अंदाज आहे. असे देखील संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले आहे. तसेच भारतात रोज जेवनासाठी जे अन्नपादार्थ बनवले जातात ते देखील मोठ्याप्रमाणात वाया जात असल्याचे समोर आले आहे.