Petrol Diesel Price : महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 104.61 रुपये प्रति लिटर आणि 95.87 रुपये प्रति लिटर वाढले आहेत. तर मुंबईतही इंधनाचे दर वाढल्याने पुन्हा एकदा महागाईचा भडका उडालाय. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

Petrol Diesel Price : महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol-Diesel Price
Image Credit source: twitter
| Updated on: Apr 05, 2022 | 7:19 AM

मुंबई : राष्ट्रीय बाजारात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती सातत्याने वाढत आहेत. 15 दिवसांत 12व्यांदा पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांनी वाढ झाली आहे. वाढलेले दर आज सकाळी सहा वाजल्यापासून लागू झाले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलसाठी प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ जाहीर केली आहे. 15 दिवसांतील ही 13वी वाढ आहे. या वाढीमुळे आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.61 रुपये, तर डिझेलची किंमत 95.87 रुपये प्रति लीटर झाली आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 119.67 रुपये आणि 103.92 रुपये आहेत.

इंधन दरवाढीचा पुन्हा भडका

तुमच्या शहरातील इंधनाचे दर

शहरपेट्रोल डिझेल
मुंबई 119.67103.92
ठाणे   119.27101.95
नागपूर 119.33102.7
औरंगाबाद119.97102.65
सांगली 119.63102.36

सीएनजीचे दर वाढले

यापूर्वी सीएनजीचे दरही किलोमागे 80 पैशांनी वाढले होते. या दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजीची नवीन किंमत 61.61 रुपये प्रति किलो झाली आहे. सीएनजीच्या दरातही आठवडाभरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. आठवडाभरात ते 2.40 रुपये किलोने महागले आहे.

दिल्ली-मुंबईतील इंधन दर

दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 104.61 रुपये प्रति लिटर आणि 95.87 रुपये प्रति लिटर वाढले आहेत. तर मुंबईतही इंधनाचे दर वाढल्याने पुन्हा एकदा महागाईचा भडका उडालाय. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर  119.67 रुपये (84 पैशांनी वाढले) आणि डिझेलचे दर 103.92 रुपये (85 पैशांनी वाढले) इतके झाले आहेत.

निवडणुकीपर्यंत पेट्रोल वाढणार?

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. पुढील निवडणुका येईपर्यंत पेट्रोलचा दर 275 रुपये प्रतिलिटर असेल. त्यांनी ट्विट करून सांगितले की, जनता म्हणत आहे की रोज 80 पैसे किंवा सुमारे 24 रुपये पेट्रोलचे दर महिना-महिना वाढतच राहिले. तर येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांदरम्यान, 7 महिन्यांत पेट्रोलचा दर 175 रुपयांच्या आसपास असेल.

इंधन दरवाढीवरुन टीका

15 दिवसांत 12 वेळा भाव वाढले आहेत

22 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत 15 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 12 वेळा वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, 24 मार्च आणि 1 एप्रिल रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे देशभरातील किमती स्थिर होत्या.

इतर बातम्या

Nagpur budget | प्रशासक सादर करणार नागपूर मनपाचा अर्थसंकल्प; कसा असणार यंदाचा अर्थसंकल्प? राजकीय पक्षांच्या नजरा

‘राज योगासह’ एप्रिलमध्ये तीन योग , या 4 राशींच्या लोकांना होणार फायदा , तुमची रास यामध्ये आहे का ?

आज होणार देवीच्या ‘कुष्मांडा’ अवताराचा जागर, जाणून घ्या पूजेची वेळ आणि सर्व काही एका क्लिकवर