‘एससीएसएस’मध्ये गुंतवणूक केल्यास होईल मोठा फायदा; जाणून घ्या काय आहे योजना?

| Updated on: Dec 10, 2021 | 6:45 AM

तुम्ही जर जेष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला जर छोट्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवयाचे असतील तर तुमच्यासाठी पोस्टाची 'एससीएसएस' ही योजना उत्तम आहे. एससीएसएस अर्थात सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम ही गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकते.

एससीएसएसमध्ये गुंतवणूक केल्यास होईल मोठा फायदा; जाणून घ्या काय आहे योजना?
Follow us on

नवी दिल्ली : तुम्ही जर जेष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला जर छोट्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवयाचे असतील तर तुमच्यासाठी पोस्टाची ‘एससीएसएस’ ही योजना उत्तम आहे. एससीएसएस अर्थात सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम ही गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकते. आपले पुढील जीवन चांगले जावे, निवृत्तीनंतर देखील आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम रहावे यासाठी अनेक जण विविध योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. त्यांच्यासाठी एससीएसएस ही एक चांगली योजना आहे. या बचत योजनेवर चांगला व्याजदर तर मिळतोच परंतु इतर देखील अनेक फायदे मिळतात. या योजनेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

खाते कोणाला उघडता येते ? 

ज्या व्यक्तीचे वय हे साठ वर्षांपेक्षा अधिक आहे, असा कोणताही व्यक्ती या योजनेतंर्गंत खाते सुरू करू शकतो. या व्यतिरिक्त  55 – 60 च्या दरम्यान निवृत्त झालेले नागरिक देखील या योजना लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत जेष्ठ नागरिकांना वैयक्तीक किंवा पती- पत्नीच्या नावाने संयुक्त खाते उघडता येऊ शकते. या योजनेमध्ये तुम्हाला एक हजारापासून ते 15 लाखांपर्यंत पैसे गुंतवता येतात. तसेच ही रक्कम आयकर अधिनियम 1961 अतंर्गत करमुक्त  असते. तिच्यावर कोणताही कर आकारला जात नाही.

व्याज किती मिळते?

एससीएसएस योजनेमधून जेष्ठ नागरिकांना चांगला परतावा मिळतो. मुदत ठेवीपेक्षा या योजनेतून मिळणारे व्याज हे अधिक असते. या योजनेंतर्गत जेष्ठ नागरिकांना 7.4 टक्के दराने व्याज देण्यात येते. हे व्याज दर सहा महिन्याला असे वर्षातून दोनदा खात्यामध्ये जमा केले जाते. व्याजातून मिळणारी ही रक्कम पुन्हा त्याच खात्यामध्ये गुंतवता येते, मात्र त्यासाठी मुळ रक्कम ही 15 लाखांच्या आत असणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

क्रिप्टो करन्सीच्या दरात घसरण; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

आता आयपीपीबीच्या अ‍ॅपवरून देखील करता येणार सिलिंडरची बुकिंग; जाणून घ्या काय आहे फायदा?

Online Fraud : ऑनलाइन व्यवहार करताय? फॉलो करा ‘या’ टिप्स, नाहीतर सायबर ठग घेतील गैरफायदा