LIC Saral Pension Yojana | आयुष्यभरासाठी मिळतील दरमहा 12 हजार, उज्वल भविष्यासाठी गुंतवणूकही लहान

| Updated on: Aug 02, 2022 | 6:38 AM

LIC Saral Pension Yojana | आयुष्यभरासाठी दरमहा 12 हजार रुपये हवे आहेत. तर एलआयसी सरल पेन्शन योजनेचे फायदे जाणून घ्या.

LIC Saral Pension Yojana | आयुष्यभरासाठी मिळतील दरमहा 12 हजार, उज्वल भविष्यासाठी गुंतवणूकही लहान
भविष्याची चिंता कशाला, एलआयसी आहे ना सोबतीला
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

LIC Saral Pension Yojana | अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीला पडलेली भारतीय आयुर्विमा महामंडळाची आणखी एक योजना म्हणजे एलआयसी सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Yojana) ही होय. एलआयसीच्या अनेक योजना (LIC insurance policy) आहेत. त्यातही अनेक लोकप्रिय योजनांमध्ये नागरिक गुंतवणूक (Investment) करतात. या योजनासोबतच भविष्याची चिंता वाहणारे काही प्लॅन ही आहेत. या योजनांमध्ये अल्प गुंतवणुकीत तुम्ही भविष्यातील खर्चाची तजवीज करु शकता. त्यासाठी मात्र नियोजन गरजेचे आहे. असाच एक प्लॅन तुमच्यासाठी एलआयसीने सुरु केलेला आहे. तो म्हणजे एलआयसी सरल पेन्शन योजना, ही एक नॉन-लिंक्ड, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक त्वरित वार्षिकी योजना आहे. जोडीदारासोबतही ही योजना घेता येईल.

गेल्या वर्षी योजना बाजारात

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) लोकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन 1 जुलै 2021 रोजी सरल पेन्शन योजना सुरू केली होती. या पॉलिसीची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही एकदाच प्रीमियम भरून दरमहा निश्चित उत्पन्न(Fixed income) मिळवू शकता. ही पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर तुम्ही कधीही कर्ज घेऊ शकता हे आणखी एक वैशिष्ट्ये या पॉलिसीतंर्गत लाभधारकांना मिळते. ही पॉलिसी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येते.

एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेतील लाभधारकाला मासिक 12 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. या प्लान अंतर्गत किमान वार्षिक उत्पन्न 12 हजार रुपये आहे. हे सर्व पॉलिसीची किमान खरेदीची किंमत, निवडलेला पर्याय आणि पॉलिसी घेणाऱ्याचे वय यावर अवलंबून असते. कमाल खरेदी रक्कमेचा उल्लेख पॉलिसीत नाही. ही योजना 40 वर्षे ते 80 वर्षे वयोगटातील व्यक्तीला खरेदी करता येते.

हे सुद्धा वाचा

काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेत जर तुम्हाला मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दरमहा किमान 1 हजार रुपये जमा करावे लागतील. त्याचप्रमाणे तिमाही पेन्शनसाठी किमान एका महिन्यात 3000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. त्याचप्रमाणे तिमाही पेन्शनसाठी किमान एका महिन्यात 3000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. एलआयसीच्या या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम भरल्यावर दोन उपलब्ध पर्यायांमधून अॅन्युइटी (Annuity) निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.पहिल्या पर्यायांतर्गत पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील आणि त्याचा मृत्यू झाल्यास वारसदाराला 100 टक्के विमा रक्कम दिली जाईल. दुसरा पर्याय म्हणजे पॉलिसीधारकाला आयुष्यभरासाठी पेन्शन मिळेल. त्यांच्या निधनानंतर पती-पत्नीला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. त्यातील एखादा साथीदार नसेल तर दुसऱ्याला विमा रक्कम देण्यात येणार आहे.