आता देशातील वाहने फ्लेक्स फ्युएलवर चालणार, हे इंधन कसे तयार होते?

| Updated on: Aug 04, 2021 | 7:06 AM

वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन लावल्यास इंधन म्हणून गॅसोलीन किंवा इथेनॉलचा वापर करता येईल. अशा वाहनांमध्ये इंधनात 83 टक्के इथेनॉलचा वापर करणे शक्य होईल.

आता देशातील वाहने फ्लेक्स फ्युएलवर चालणार, हे इंधन कसे तयार होते?
फ्लेक्स फ्युएल
Follow us on

वी दिल्ली: केंद्र सरकारने आगामी वर्षभराच्या काळात देशात फ्लेक्स फ्युएलचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यादृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. ब्राझील आणि अमेरिकेत सध्या या इंधनाचा यशस्वी आणि कार्यक्षमपणे वापर सुरु आहे. त्यामुळेच केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी वाहन कंपन्यांना फ्लेक्स फ्युएलला अनुकूल इंजिन्स बनवण्याचे निर्देश दिले होते.

वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन लावल्यास इंधन म्हणून गॅसोलीन किंवा इथेनॉलचा वापर करता येईल. अशा वाहनांमध्ये इंधनात 83 टक्के इथेनॉलचा वापर करणे शक्य होईल. फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असणाऱ्या वाहनांमध्ये वन फ्यूल सिस्टम असते. त्यामुळे इथेनॉलची रासायनिक प्रक्रिया होऊन उर्जा निर्माण होते.

फ्लेक्स-फ्यूएल इंजिनमुळे काय होणार?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, मी एक आदेश जारी करणार आहे. त्यानुसार देशातील वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिन नव्हे तर फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असेल. त्यामुळे लोकांना इंधन म्हणून 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येईल. येत्या आठ ते दहा दिवसांत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यानंतर देशभरात वाहननिर्मिती उद्योगासाठी फ्लेक्स-फ्यूएल इंजिन अनिवार्य होईल. इथेनॉलचा वापर वाढल्यास भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे लक्ष्य

पुढील दोन वर्षांत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यामुळे देशाला महाग तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी करण्यास मदत होईल. केंद्र सरकारने 2025 पर्यंत हे लक्ष्य साध्य करण्याचे ठरवले होते. परंतु आता सरकारने निर्णय बदलला आहे. सरकारला हे लक्ष्य आता 2023 पूर्वी साध्य करायचे आहे.

गडकरी म्हणाले की, सध्या पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते. 2014 मध्ये हेच प्रमाण 1-1.5 टक्के इतकं होतं. ते म्हणाले की इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा चांगले इंधन आहे आणि ते आपल्याला आयात करावं लागत नाही. हे इंधन कमी खर्चिक, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी आहे. फ्लेक्स-फ्यूल इंजिन अनिवार्य केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. कारण आपला देश कॉर्न सरप्लस आहे, आपण शुगर-गहु सरप्लस आहोत, आपल्याकडे हे सर्व धान्य साठवण्यासाठी जागा नाही.

इथेनॉल म्हणजे काय?

इथॅनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे, जे पेट्रोलमध्ये मिसळलं जातं आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरलं जातं. इथेनॉल ऊसापासून तयार होतं. हे पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा सामान्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल. इथेनॉलने चालवलेली कार पेट्रोलपेक्षा कमी गरम होते. इथेनॉलमध्ये अल्कोहोलचे पटकन बाष्पीभवन होते, ज्यामुळे इंजिन लगेच गरम होत नाही.

इतर बातम्या

सर्वसामान्यांना दिलासा, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवानासह इतर कागदपत्रांबाबत मोठा निर्णय

वायू प्रदूषण टाळण्यासाठी सरकारने कंबर कसली; सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

जुलैपासून Maruti Suzuki च्या सर्व गाड्या महागणार, त्याआधीच बंपर डिस्काऊंटसह वाहन खरेदीची संधी