जुलैपासून Maruti Suzuki च्या सर्व गाड्या महागणार, त्याआधीच बंपर डिस्काऊंटसह वाहन खरेदीची संधी

भारतातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) जुलै महिन्यापासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहे.

जुलैपासून Maruti Suzuki च्या सर्व गाड्या महागणार, त्याआधीच बंपर डिस्काऊंटसह वाहन खरेदीची संधी
Maruti Suzuki
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jun 21, 2021 | 3:59 PM

मुंबई : भारतातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) जुलै महिन्यापासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहे. कंपनीने रेग्यूलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे की, वाहनांच्या किंमतीत वाढ करणे अनिवार्य झाले आहे. पुढील महिन्यापासून कंपनी आपल्या वाहनांच्या नवीन किंमती जाहीर करणार आहे. (Maruti Suzuki going to increase its car price from july 2021)

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आपल्या रेग्यूलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीच्या वाहनांच्या किंमतींवर सातत्याने परिणाम होत असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे या वाहनांच्या किंमती वाढवून थोडासा भार ग्राहकांवर टाकणे अनिवार्य झाले आहे. यासह, कंपनीने पुढे म्हटले आहे की, या किंमती वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार बदलतील.

याआधीही किंमतीत वाढ

यापूर्वी इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे कंपनीने एप्रिलमध्ये आपल्या मोटारींची किंमत वाढविली होती. जानेवारीमध्येही मारुती सुझुकीने इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे काही मोटारींच्या किंमती वाढवल्या होत्या. कारच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आणि रेंजनुसार कंपनीने 34 हजार रुपयांची वाढ केली आहे.

उत्पादन पुन्हा रुळावर

कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे, देशभरातील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळे कंपन्यांनी पुन्हा एकदा उत्पादनाला जोमात सुरुवात केली आहे. तसेच विक्री आणि वाहनांची डिलीव्हरीदेखील सुरु झाली आहे. लॉकडाउन आणि कर्फ्यूमुळे सर्व ऑटोमेकर्सनी त्यांचे उत्पादन थांबवले होते, पण आता परिस्थिती रुळावर आली आहे. मारुती सुझुकीच्या प्रवक्त्याने सांगितले की, सुरक्षा नियमांचे पालन करून कंपनीच्या प्लांटमध्ये उत्पादन सुरू झाले आहे.

या महिन्यात बंपर डिस्काऊंट

मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या मोटारींवर बंपर सवलत देत आहे. कंपनीच्या नेक्सा डीलरशिपच्या गाड्यांवर ग्राहकांना 41 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यात Baleno, Ignis, XL6, S-Cross आणि Ciaz सारख्या मोटारींवर सूट देण्यात येत आहे. ही सवलत मर्यादित काळासाठी आहे आणि ही ऑफर वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि डीलरशिपमध्ये वेगवेगळी असू शकते.

इतर बातम्या

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय

सिंगल चार्जवर 220km रेंज, होंडाची Two-Door इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Maruti Swift ला मागे टाकत ‘ही’ कार ठरली देशात नंबर वन, लॉकडाऊन असूनही रेकॉर्डब्रेक विक्री

(Maruti Suzuki going to increase its car price from july 2021)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें