AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय

तुम्हाला नवीन कार घ्यायची आहे, परंतु कुटुंब मोठे आहे आणि बजेट कमी आहे, अशा परिस्थितीत तुम्ही 7 सीटर बजेट कारचा विचार करायला हवा.

'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय
Maruti Suzuki Ertiga
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: | Updated on: Apr 30, 2021 | 8:14 AM
Share

मुंबई : तुम्हाला नवीन कार घ्यायची आहे, परंतु कुटुंब मोठे आहे आणि बजेट कमी आहे, अशा परिस्थितीत तुम्ही 7 सीटर बजेट कारचा (Seven seater Cars) विचार करायला हवा. विशेष म्हणजे कमी बजेटमध्ये मोठी कार खरेदी करायची असेल तर बाजारात बरेच पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही 7 सीटर कारंबद्दल सांगणार आहोत, ज्या स्वस्त आणि दमदार आहेत. या कार्सच्या किंमती 4 लाखांच्या आसपास आहेत. (Best Seven seater Cars under 5 lakhs of big family)

मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco)

मारुती कार भारतात सर्वाधिक विकल्या जातात. मारुती सुझुकीच्या 7 सीटर इकोला (Eeco) देशभरात मोठी मागणी आहे. मारुती सुझुकी इकोची किंमत 3,97,800 रुपये (दिल्ली एक्स शोरूम) इतकी आहे. इकोमध्ये 1196 सीसी 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 6000 आरपीएम वर 72.41 एचपीची शक्ती आणि 3000 आरपीएम वर 101 एनएम टॉर्क जनरेट करतं. मारुती सुझुकी इको पेट्रोल व्हेरिएंट 16.11 किमी प्रतिलिटर मायलेज देऊ शकतं, तसेच मारुती सुझुकी इको सीएनजीमध्ये 21.94 किमी प्रति किलो मायलेज देते.

डॅट्सन गो प्लस (Datsun Go Plus)

डॅटसन गो प्लस ही देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आहे. या कारची सुरुवातीची किंमत 4.20 लाख रुपये इतकी आहे. म्हणजेच मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबासाठी ही कार बेस्ट आहे. या कारचा लुकदेखील चांगला आहे. डॅटसन गो प्लसमध्ये 1198 सीसी 3 सिलेंडर SOHC पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5000 आरपीएम वर 67 Hp पॉवर आणि 4000 आरपीएमवर 104 एनएम टॉर्क निर्माण करतं.

रेनॉ ट्रायबर (Renault Triber)

स्वस्त आणि स्टायलिश 7 सीटर कार्सच्या यादीत रेनॉ ट्रायबर ही तिसरी कार आहे. 7 सीटर रेनॉ ट्रायबरची किंमत 5.20 लाख रुपये इतकी आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 7,50,000 रुपये इतकी आहे. मध्यम वर्गीय कुटुंबांसाठी ही एक उत्तम कार आहे. या कारचा लुक एखाद्या प्रीमियम कारसारखा आहे.

Renault Triber मध्ये 999cc चं 3 सिलेंडर इंजिन आहे, जे 6250 आरपीएम वर 71 एचपीची शक्ती आणि 3500 आरपीएम वर 96 एनएम टॉर्क उत्पन्न करतं. या कारच्या फीचर्सविषयी सांगायचे झाल्यास ट्रायबरमध्ये 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, दुसर्‍या आणि तिसर्‍या रो सीटसाठी एसी व्हेंट आणि सुरक्षिततेसाठी एअर बॅग्स आहेत.

मारुती सुझुकी अर्टिगा (Maruti Suzuki Ertiga)

याशिवाय मारुती सुझुकी अर्टिगा हीसुद्धा मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबासाठी उत्तम कार आहे. या 7 सीटर कारची सुरूवात किंमत 7.59 लाख रुपये आहे. ही कार सीएनजी व्हेरिएंटमध्येही उपलब्ध आहे. या कारला भारतात मोठी मागणी आहे.

इतर बातम्या

बंपर ऑफर : XUV500 ते Maruti Baleno, ‘या’ 8 गाड्यांवर 85,800 रुपयांपर्यंतची सूट

रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांना ‘ब्रेक लागणार’, ‘या’ कंपनीची भन्नाट आयडिया

व्या अवतारात 2021 Renault Triber MPV भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Best Seven seater Cars under 5 lakhs of big family)

Follow Us
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या