AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U-19 Asia Cup IND vs AFG : ज्यूनियर सेहवागचा धमाका, सेम बाबांसारखा खेळला, 8 सिक्स-फोर मारुन समोरच्या टीमच गणितच बिघडवलं

U-19 Asia Cup IND vs AFG : टीम इंडिया अंडर 19 आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. या मॅचमध्ये आर्यवीर सेहवागची तडाखेबंद बॅटिंग पहायला मिळाली. फायनलमध्ये पुन्हा एकदा समोर पाकिस्तानचा संघ असणार आहे.

U-19 Asia Cup IND vs AFG : ज्यूनियर सेहवागचा धमाका, सेम बाबांसारखा खेळला, 8 सिक्स-फोर मारुन समोरच्या टीमच गणितच बिघडवलं
Aryavir Sehwag
| Updated on: Nov 12, 2026 | 5:43 PM
Share

अंडर 19 आशिया कपमध्ये आज टीम इंडियाचा महत्वाचा सामना होता. या मॅचमध्ये ज्यूनियर सेहवागने जबरदस्त बॅटिंग केली. यूएई विरुद्ध सेंच्युरी झळकवणाऱ्या आर्यवीर सेहवागने सेमीफायनल मॅचमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावलं. आर्यवीरने 57 चेंडूत 51 धावा केल्या. त्याने आपल्या इनिंगमध्ये 4 फोर आणि 4 सिक्स मारले. आर्यवीरने कॅप्टन लक्ष्य रायचंदानी सोबत मिळून 117 धावांची पार्टनरशिप केली. आर्यवीरच्या या इनिंगमध्ये एक गोष्ट खटकली. हाफसेंच्युरी झळकवल्यानंतर तो लगेच आऊट झाला. आर्यवीर सेहवागने अफगाणिस्तान विरुद्ध धीमी सुरुवात केली. त्याने चौथ्या चेंडूवर चौकार मारला. पण त्यानंतर आर्यवीरला धावांसाठी संघर्ष करावा लागला. स्ट्राइक रोटेट करताना त्याची झुंज सुरु होती.

पण आर्यवीरने टेन्शन घेतलं नाही. एकदा खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर त्याने गोलंदाजांवर हल्लाबोल केला. स्पिनर गोलंदाजीला येताच त्याने खोऱ्याने धावा लुटल्या. आर्यवीरने 13 व्या ओव्हरमध्ये सोहेल खानच्या तीन चेंडूंवर दोन सिक्स मारले. हाफसेंच्युरी त्याने सिक्स मारुन पूर्ण केली. पण पुढच्याच चेंडूवर पुल शॉट मारण्याच्या नादात त्याचा विकेट गेला.

सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज

आर्यवीर सेहवागने अंडर 19 आशिया कपच्या प्रत्येक सामन्यात अशीच फलंदाजी केलीय. नेपाळ विरुद्ध त्याने 70 धावा केल्या होत्या. पाकिस्तान विरुद्ध 22 रन्स करुन आऊट झालेला. पण यूएई विरुद्ध त्याने शतकी कामगिरी केली. त्याने 160 धावा केल्या. आर्यवीरने अफगाणिस्तान विरुद्ध 51 धावा केल्या. आर्यवीरने षटकार मारुन आपलं अर्धशतक पूर्ण केलं. आर्यवीर अंडर 19 आशिया कपमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. त्याने चार सामन्यात 303 धावा केल्या आहेत. यात 29 फोर आणि 16 सिक्स आहेत.

भारताचा फायनलमध्ये प्रवेश

भारताने अफगाणिस्तानवर विजय मिळवून अंडर 19 आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हर्समध्ये 8 बाद 227 धावा केल्या. टीम इंडियाने दोन विकेट गमावून हे 37 व्या ओव्हरमध्ये हे लक्ष्य पार केलं. आर्यवीर सेहवागच्या 51 धावा आणि लक्ष्य रायचंदानीच्या 93 धावा या बळावर हे आव्हान पार केलं.

Follow Us
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'
लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
Mumbai Local case : लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या...
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या निर्णयावरून नवा वाद!
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी