असं एक शहर जिथे भरतो सुंदर तरुणींचा बाजार, दहा हजारात तरुणासोबत लग्न, पण नेमकं कारण काय?
आजच्या काळात लग्नाचा प्रश्न खूप गंभीर बनला आहे. लग्न न झालेल्या मुलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नासाठी सुंदर मुलींचा बाजार भरतो, या ठिकाणी विवाह इच्छूक तरुण मोठ्या संख्येनं गर्दी करतात.

बग्लेरियामध्ये लग्नासाठी तरुणीचा बाजार भरतो. जिथे दरवर्षी हजारो मुली लग्नासाठी एकत्र येतात. या मुलींची किंमत त्यांच्या कुटुंबाकडून निश्चित केली जाते. बल्गेरियाचे रोमा लोकांमध्ये ही प्रथा पहायला मिळते, रोमा लोक हे जिप्सी समुदायातील लोकं आहेत. जगभरात यांची संख्या जवळपास 8 कोटी आहे. हे लोक स्वत:ला भारतीय मानतात. आम्ही मुळचे उत्तर भारतीय आहोत, असं ते सांगतात. शेकडो वर्षांपूर्वी आमचे पूर्वज राजस्थानमधून रोमानिया आणि बल्गेरियामध्ये स्थायिक झाल्याचं ते सांगतात. यातील अनेक लोकं हे कायमस्वरुपी युरोपमध्ये स्थायिक झाले, तर काही लोकं हे मध्य पूर्वेमध्ये देखील स्थायिक झाले आहेत, जे रोमा लोक मध्य पूर्वेत स्थायिक झाले आहेत, त्यांची परिस्थिती मात्र अत्यंत हलाकीची आहे.
मध्य पूर्वेत जे रोमा जातीचे लोक स्थायिक झाले आहेत, त्यांच्यावर आतापर्यंत अन्यायच होत आला आहे. या लोकांना कायमच समाजाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे या लोकांच्या परंपरा या मध्य पूर्वेतील ज्या प्रतिष्ठित जाती आहेत, त्यांच्यापेक्षा खूप वेगळ्या आहेत. त्यामुळेच या लोकांना कायम समाजाबाहेर ठेवण्यात आलं आहे.बग्लेरियाची राजधानी सोफियामध्ये रोमा लोक मोठ्या संख्येनं राहतात. हे लोक खूप गरीब असून प्रचंड हालाकीच जीवन जगतात.
या लोकांमध्ये एक प्रथा आहे. इथे दरवर्षी एक मोठा मेळावा भरतो. जिथे हे लोक आपल्या मुलींना लग्नासाठी आणतात, या मेळाव्यात जगभरातून तरुण सहभागी होतात. ज्या तरुणाला जी मुलगी आवडेल तिच्यासोबत तो लग्न करतो. मात्र यांची पद्धत ही खूप वेगळी आहे, जेव्हा एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते, तेव्हा त्याच्या बदल्यात त्या तरुणाला तिच्या आई-वडिलांना एक विशिष्ट किंमत द्यावी लागते, पैसे द्यावे लागतात. त्यानंतर ती मुलगी या मुलासोबत लग्न करते. या लग्न मेळाव्याला जगभरातून लोकं येत असल्यामुळे या समाजातील तरुणींचं जगभरात स्थलांतर होतं. या ठिकाणी अवघ्या दहा ते वीस हजारांच्या मोबदल्यामध्ये तरुणीचं लग्न लावून दिलं जातं.
