Omraje Nimbalkar: ‘ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार?’ ओमराजेंचे सर्वात मोठे विधान; थेट म्हणाले,…..
पुन्हा एकदा त्यांनी एकत्रीकरणाबाबत सकारात्मक भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, ओमराजेंच्या या विधानाकडे आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाहिलं जात आहे.

श्रीराम क्षीरसागर, प्रतिनिधी टीव्ही9 मराठी
Omraje Naik Nimbalkar: राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरु असतानाच आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एक मोठे विधान केले आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर माझ्यासारखा आनंदी दुसरा कोणी नसेल, असं महत्त्वाचे विधान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यातील दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा दुजोरा देणारे विधान केले आहे. दोन्ही शिवसेना एकत्रित आल्या तर माझ्यासारखा आनंदी दुसरा कोणी नसेल, असं ओमराजे म्हणालेत. अलिकडेच दोन दिवसांपूर्वीच दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वसामान्य जनतेचे भले होईल, असं वक्तव्य त्यांनी tv9 शी बोलताना केलं होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी एकत्रीकरणाबाबत सकारात्मक भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, ओमराजेंच्या या विधानाकडे आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाहिलं जात आहे.
काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?
“हा सर्व वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय आहे, माझ्यासारखा सामान्य माणूस फक्त इच्छा व्यक्त करु शकतो, भावना मांडू शकतो. मात्र याबाबाबत सर्वोतपरी निर्णय वरिष्ठच घेऊ शकतात असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. माझी भावना मी आधीच मांडली आहे. दोन्ही शिवसेना जर एकत्र आल्यातर माझ्याएवढा आनंदी कोणी नसेल,” असं ते म्हणाले.
राणाजगजितसिंह यांच्यावर निशाणा!
यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरही निशाणा साधला.” या धाराशिव जिल्ह्यातील लोकांना दूधात मिठाचा खडा टाकण्याची सवय आहे. तुम्हाला निधी आणता येत असेल तर तुम्ही अजून आणा. मात्र मी आठवडे बाजारासाठी आणलेला १८ कोटींचा निधी त्यावर नगरपालिकेने एनओसी दिली नाही, अडवणूक करण्याचा हा प्रकार आहे, 40 वर्ष हाच प्रकार सुरु आहे, अडवा अन जिरवा या प्रकारामुळेच माझा पक्षप्रवेश झाला,” असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.
