AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 किमी रेंज, घरात बॅटरी काढून चार्जिंग करता येणार, बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर

100 किमी रेंज आणि दररोज ऑफिसला जाण्यासाठी एकदम बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर. बॅटरी काढून घरात किंवा ऑफिसमध्ये करू शकता चार्जिंग. फीचर्स देखील जबरदस्त.

100 किमी रेंज, घरात बॅटरी काढून चार्जिंग करता येणार, बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 12, 2026 | 5:13 PM
Share

दुचाकी उत्पादक कंपनी Vespa ने आपल्या 2027 इलेक्ट्रिक स्कूटर पोर्टफोलिओमध्ये मोठे अपडेट केले आहे. कंपनीने मिलान मोटरसायकल शो (EICMA 2026) मध्ये तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केले आहेत. यामध्ये Sprint S, Primavera आणि Primavera Tech या मॉडेल्सचा समावेश आहे. या तिन्ही स्कूटर्समध्ये Vespa ची पारंपरिक इटालियन डिझाइन कायम ठेवण्यात आली असून, आधुनिक इलेक्ट्रिक मोटर आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यातील टॉप मॉडेल एका चार्जमध्ये 100 किलोमीटरपर्यंत रेंज देण्याचा दावा करते. तसेच फास्ट चार्जिंगची सुविधाही मिळते.

1. Vespa Sprint S आणि Primavera

Sprint S आणि Primavera ही दोन्ही मॉडेल्स प्रामुख्याने शहरातील दैनंदिन प्रवासासाठी तयार करण्यात आली आहेत. या स्कूटर्सचा कमाल वेग 45 kmph इतका आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ECO मोडमध्ये या दोन्ही स्कूटर्स एका चार्जमध्ये 85 किलोमीटरपर्यंत धावू शकतात.

या मॉडेल्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची रिमूव्हेबल बॅटरी. म्हणजेच चार्जिंगसाठी संपूर्ण स्कूटर चार्जिंग पॉइंटजवळ नेण्याची गरज नाही. ग्राहक बॅटरी बाहेर काढून घरात किंवा ऑफिसमध्ये चार्ज करू शकतात.

2. Vespa Primavera Tech

Primavera Tech हे या सीरिजमधील सर्वात प्रीमियम आणि फ्लॅगशिप मॉडेल आहे. या स्कूटरचा कमाल वेग 67 kmph आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ECO मोडमध्ये ही स्कूटर एका चार्जमध्ये 100 किलोमीटरपर्यंत रेंज देते. तर WMTC चाचणी प्रक्रियेनुसार तिची प्रमाणित रेंज 90 किलोमीटर आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत प्रमाणित रेंजमध्ये 12.5 टक्क्यांची वाढ झाल्याचा कंपनीचा दावा आहे.

नवीन इलेक्ट्रिक मोटर आणि फास्ट चार्जिंग

या तिन्ही स्कूटर्समध्ये Piaggio Group ने इटलीमध्ये विकसित आणि उत्पादित केलेली नवीन इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. या मोटरचे मॉड्युलर आर्किटेक्चर अधिक कार्यक्षमता, कमी वीज वापर आणि चांगला प्रतिसाद देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. तसेच मोटरमध्ये रेअर अर्थ मटेरियलपासून बनवलेल्या पार्ट्सचा वापर करण्यात आलेला नाही.

भारतात कधी लॉन्च होणार?

Vespa ने या नवीन 2027 इलेक्ट्रिक स्कूटर रेंजची भारतातील लॉन्चिंग तारीख किंवा किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. सध्या कंपनी भारतीय बाजारात प्रामुख्याने पेट्रोल इंजिन असलेल्या स्कूटर्सची विक्री करते.

Follow Us
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक