AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yamaha ची 16-इंचाच्या चाकांची इलेक्ट्रिक स्कूटर Xenter E लाँच, किती आहे रेंज पाहूयात…

Yamaha Electric Scooter: यामाहाने आपली मोठ्या चाकांची नवीन इलेक्ट्रीक स्कूटर Yamaha Xenter E सादर केली आहे.या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये 16-इंचाची मोठी चाके दिली आहेत. या स्कूटरची काय आहेत वैशिष्ट्ये पाहूयात...

Yamaha ची 16-इंचाच्या चाकांची इलेक्ट्रिक स्कूटर Xenter E लाँच, किती आहे रेंज पाहूयात...
Yamaha Xenter E
| Updated on: Nov 12, 2026 | 4:56 PM
Share

जपानची टु – व्हिलर निर्माता कंपनी यामाहाने आपली नवीन मोठ्या चाकांची इलेक्ट्रीक स्कूटर सादर केली आहे. ज्याचे नाव Yamaha Xenter E आहे. युरोपात या पुढच्या वर्षी म्हणज साल २०२७ मध्ये लाँच करण्याची योजना आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये १६- इंचाची मोठी चाके दिली आहेत. आणि ही स्कूटर १०८ किलोमीटर रेंजसह शानदार फिचर्ससह येत आहे. या सोबतच यामाहाने पेट्रोलवर धावणाऱ्या Xenter कॉन्सेप्टची देखील झलक दाखवली आहे. मात्र, कंपनीने हिच्या फिचर्स आणि लाँच टाईमलाईनबद्दल माहिती दिलेली नाही. या दोन्ही स्कूटर्सची निर्मिती व्हिएतनाम येथे केली जाणार आहे. चला तर यामाहाच्या नव्या Xenter E इलेक्ट्रिक स्कूटरच्या वैशिष्ट्यांसंदर्भात माहिती घेऊयात.

16-इंचाचे मोठे अलॉय व्हील्स

या इलेक्ट्रीक स्कूटरचे सर्वात मोठी खासियत हीचे 16 इंचाचे मोठ अलॉय व्हील्स आहेत. यात पुढे 100/80 आणि मागे 120/80 टायर्स दिले आहेत. मोठी चाके असल्याने ही स्कूटर खड्डे आणि दगडी तसेच खराब रस्त्यांवर आरामदायक रायडिंगचा अनुभव देते. भारतात बहुतांशी मॅक्सी-स्कूटर्समध्ये 14 इंचाची चाके असतात.

सिंपल आणि प्रॅक्टिकल डिझाईन

डिझाइन – यामाहाने आपल्या या नव्या Xenter E स्कूटरला खूप मर्यादित डिझाईन दिली आहे.

मॉडर्न लाइटिंग – यात कॉम्पॅक्ट हेक्सागोनल हेडलाइट, व्हर्टिकली स्टॅक्ड DRLs, स्टेप-अप सीट आणि फ्लॅट फुटबोर्ड देण्यात आला आहे.

कलर ऑप्शंस -या प्लॅटिनम सिल्वर आणि मिडनाईट ब्लॅक कलर्समध्ये उतरवण्यात आले आहे.

रेंज, बॅटरी आणि परफॉर्मन्स

कंपनीच्या म्हणण्यानुसार Xenter E चा परफॉर्मन्स कोणत्याही 125cc पेट्रोल स्कूटरच्या तोडीचा आहे.

बॅटरी आणि रेंज – यात 3.5 kWh चा फिक्स्ड L-शेप लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला असून तो फूल चार्जमध्ये सुमारे 108 किलोमीटरची रेंज देतो. बॅटरी पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहण्याासठी IP67-रेटेड सुरक्षा दिली आहे.

मोटर सेटअप – यात एअर कुल्ड परमानंट मॅग्नेट मोटर आणि रिडक्शन गिअरला एकाच युनिटशी जोडण्यात आला आहे. यास 10 bhp ची पॉवर आणि 33.35 Nm च्या पीक टॉर्क जनरेट करतो. यात

चार्जिंग टाईम – स्कूटर सोबत 800-वॅटचा ऑनबोर्ड चार्जर देण्यात आला आहे. यात 0 ते 100% चार्ज करण्यास 5.5 तासाचा वेळ घेते. याला पब्लिक चार्जिंग नेटवर्कवर देखील चार्ज केले जाऊ शकते.

5-इंचाचा TFT डिस्प्ले आणि सेफ्टी फीचर्स

रायडिंग मोड्स – रायडिंगसाठी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये S (स्पोर्टी), T (डेली कम्यूट) आणि E (मॅक्सिमम रेंज) असे तीन रायडिंग मोड्स दिले आहेत. यात रीजेनरेटिव ब्रेकिंगचे फीचर देखील आहे.

स्मार्ट डॅशबोर्ड – यात 5-इंचाचा कलर TFT डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात टर्न-बाय-टर्न नेव्हीगेशन, बॅटरी आणि सर्व्हीस स्टेटस आणि पार्किंग लोकेशन सारखे कनेक्टिविटी फिचर्स मिळत आहेत.

सेफ्टी फीचर्स – यात नवीन अंडरबोन फ्रेम, पुढे टेलिस्कोपिक फोर्क्स, पाठी डुअल शॉक एब्जॉर्बर, पुढे मागे 245 mm चे डिस्क ब्रेक्ससह ABS, स्मार्ट-की इग्निशन आणि USB Type-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.

Follow Us
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक