AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंपर ऑफर : XUV500 ते Maruti Baleno, ‘या’ 8 गाड्यांवर 85,800 रुपयांपर्यंतची सूट

सर्वच प्रमुख कार उत्पादक कंपन्या एप्रिल 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात सवलती देत आहेत. (Bumper offer on Renault Kwid, Honda City, Tata Nexon,)

बंपर ऑफर : XUV500 ते Maruti Baleno, 'या' 8 गाड्यांवर 85,800 रुपयांपर्यंतची सूट
Maruti Suzuki Baleno
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 29, 2021 | 9:58 AM
Share

मुंबई : ऑटो कंपन्यांनी एप्रिल महिन्यात त्यांच्या मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत, तरीही आपण काळजी करण्याची गरज नाही. कारण बहुतेक कार कंपन्या एप्रिल महिन्यात उत्तम ऑफर देत आहेत. मारुती, होंडा ते रेनॉपर्यंत जवळजवळ सर्वच प्रमुख कार उत्पादक कंपन्या एप्रिल 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात सवलती देत आहेत. रेनॉ क्विड (Renault KWID), मारुती बलेनो (Maruti Suzuki Baleno) आणि ह्युंदाय सॅंट्रोसारख्या (Hyundai Santro) छोट्या मोटारी आणि हॅचबॅकच्या खरेदीवरही विशेष ऑफर आणि लाभ देण्यात येत आहे. या ऑफर्समध्ये ग्राहकांना 85,800 रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. आपण या महिन्यात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण या कार्सचा विचार करु शकता. (Bumper offer on Honda City, Renault Kwid, Tata Nexon, Maruti Baleno, Tata Nexon, Mahindra XUV300 and XUV500)

Renault Kwid

Renault Kwid ही कार 20000 रुपयांच्या एक्सचेंज बोनस आणि 10000 रुपयांच्या रोख डिस्काऊंटसह विकली जात आहे. या व्यतिरिक्त या कारच्या 1.0 लीटर व्हेरिएंटवर 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटदेखील उपलब्ध आहे. दुसरीकडे, सर्व Kwid व्हेरिएंट्सवर 10,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे. क्विड व्यतिरिक्त रेनॉ कंपनी त्यांच्या Triber, Kiger आणि Duster SUV या मॉडेल्सवरही सूट देत आहे.

होंडा सिटी (Honda City)

होंडा आपल्या नवीन पाचव्या जनरेशन सिटी सेडानच्या खरेदीवर सवलत आणि लाभ देत आहे. सध्या या कारच्या सर्व व्हेरिएंट्सवर 10000 रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर देण्यात आली आहे. त्याशिवाय होंडाच्या विद्यमान ग्राहकांना 5,000 रुपयांचा निष्ठा (लॉयल्टी) बोनसही देण्यात येत आहे.

मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno)

मारुती बलेनो या कारवर एकूण 33,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. यामध्ये 20,000 रुपयांपर्यंतची रोख सवलत, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सवलतीचा समावेश आहे. या ऑफर बलेनो हॅचबॅकच्या बेस-स्पेक सिग्मा व्हेरिएंट्सवर लागू आहेत. दुसरीकडे, बलेनोच्या सीव्हीटी व्हेरिएंटवर कोणतीही रोख सवलत देण्यात आलेली नाही. याशिवाय इग्निस, सियाझ एक्सएल – 6 आणि एस-क्रॉस सारख्या मारुती कारसुद्धा अशाच सवलतीत उपलब्ध आहेत.

ह्युंदाय सँट्रो (Hyundai Santro)

ह्युंदाय मोटर इंडियाने आपली लाँगबॉय हॅचबॅक सँट्रोच्या (Hyundai Santro) खरेदीवर 35,000 रुपयांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. या रकमेत 20,000 रुपयांपर्यंतची रोख सवलत आणि 10,000 रुपयांपर्यंतच्या फायनॅन्स बोनसचा समावेश आहे. याशिवाय सॅंट्रोच्या खरेदीवर 5,000 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे.

Mahindra XUV300 आणि XUV500 SUV

एप्रिल महिन्यात महिंद्राची कॉम्पॅक्ट एसयूव्ही-एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV300) च्या खरेदीवर ग्राहक एकूण 44,500 रुपयांपर्यंतचा फायदा घेऊ शकतात. या रकमेमध्ये 10,000 रुपये रोख सूट, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांच्या कॉर्पोरेट सवलतीचा समावेश आहे. XUV500 मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. एक्सयूव्ही 500 च्या खरेदीवर महिंद्रा 85,800 रुपयांपर्यंतचा लाभ देत आहे. यात 36,800 रुपयांपर्यंतची रोख सवलत, 25,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 9,000 रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट सवलत समाविष्ट आहे.

टाटा नेक्सन (Tata Nexon) आणि हॅरियर एसयूव्ही (TATA Harrier)

टाटाची कॉम्पॅक्ट SUV – Nexon च्या डिझेल व्हेरिएंटवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज लाभ मिळत आहे. दुसरीकडे, हॅरियर कॅमो, डार्क एडिशन, XZ + आणि XZA + 40,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह खरेदी करता येईल. हॅरियर एसयूव्हीचे उर्वरित ट्रिम अनुक्रमे 25,000 रुपये आणि 40,000 रुपयांच्या रोख डिस्काऊंट आणि फायनॅन्स लाभांसह आहेत.

इतर बातम्या

शानदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 2 लाखात

मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर कार, किंमत 4 लाखांहून कमी, ‘या’ आहेत टॉप 4 कार्स

VIDEO | कशी होते गाड्यांची Crash Test? कारच्या प्रत्येक पार्टची चाचणी

(Bumper offer on Honda City, Renault Kwid, Tata Nexon, Maruti Baleno, Tata Nexon, Mahindra XUV300 and XUV500)

Follow Us
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान