देशातील 5 सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक हॅचबॅक कार्स, 23KMPL मायलेज, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

अक्षय चोरगे

|

Updated on: Apr 21, 2021 | 5:13 PM

आज आम्ही तुम्हाला 5 अशा ऑटोमॅटिक हॅचबॅक कार्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्या कमी बजेटमध्ये खरेदी करता येतील.

देशातील 5 सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक हॅचबॅक कार्स, 23KMPL मायलेज, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

Follow us on

मुंबई : बजेट हॅचबॅक कार (Affordable Automatic Hatchback Cars) खरेदी करणे आणि तिच्या देखभालीसाठी सहसा जास्त पैसे खर्च होत नाहीत. या गाड्या मॅन्युअल ट्रान्समिशन तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह एक्स्ट्रा फीचर्ससह येतात. या कार्स तुलनेने शहरी भागात जास्त वापरल्या जातात. या कार्समधील ऑटोमॅटिक गिअरबॉक्स वेगळ्या स्तरावर क्लासिफाय केलेले असतात. (Santro, WagonR, Tiago, S-Presso are most affordable automatic hatchback cars with mileage up to 23 km)

तुम्ही जर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाली हॅचबॅक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि कोणती कार घ्यावी? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही यामध्ये तुमची मदत करणार आहोत. आज आम्ही तुम्हाला 5 अशा ऑटोमॅटिक हॅचबॅक कार्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्या कमी बजेटमध्ये खरेदी करता येतील. यामध्ये ह्युंदाय सँट्रो (Hyundai Santro), मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki Wagon R), डॅट्सन गो (Datsun Go), मारुती सुझुकी एस प्रेसो (Maruti Suzuki S-Presso) आणि टाटा टियागो (TATA Tiago) या कार्सचा समावेश आहे. चला तर मग या पाच कार्सबद्दलची माहिती जाणून घेऊया.

TATA Tiago

TATA Tiago ही एक उत्तमत हॅचबॅक कार आहे. गेल्या काही वर्षांपासून या कारचा भारतीय बाजारात चांगलाच दबदबा आहे. दरम्यान, टाटा मोटर्सने (Tata Motors) टियागो लिमिटेड एडिशन (Tiago Limited Edition) कार दोन महिन्यांपूर्वी 5.79 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) या प्राईस टॅगसह सादर केली आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 6.74 लाख रुपये इतकी आहे.

Tiago मध्ये 14 इंचांचे एलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. रेग्युलर ट्रिमशिवाय Tiago लिमिटेड एडिशनमध्ये रियर पार्सल ट्रे आणि वॉईस कमांड सिस्टिमसह पाच इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. अडंर द हुड गाडीत 1.2 लीटरचं रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 85 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतं. याची मोटर 5 स्पीड मॅनुअल युनिटद्वारे जबरदस्त पॉवर देते. ही कार 23.84 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.

टाटा मोटर्स कंपनीची टाटा टियागो (TATA Tiago) ही कार 2016 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. लाँचिंगपासूनच या कारला भारतीय मार्केटमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान, भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या टियागोला ग्लोबल NCap सुरक्षा टेस्टमध्ये चार स्टार रेटिंग मिळलं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत टाटा टियागो पास झाली आहे, असं म्हणता येईल.

Maruti Suzuki S-Presso

मारुती एस-प्रेसोची किंमत 4.8 लाखांपासून ते 5.8 लाख रुपयांपर्यंत आहे. ही छोटी एसयूव्ही Standard, LXI, VXI आणि VXI+ या चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. एस प्रेसोमध्ये 10 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. ईबीडीसह एबीएस, ड्रायव्हर साइड एअरबॅग्स, रिअर पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टम असे फीचर्स यामध्ये आहेत. या कारमध्ये मोठी केबिन देण्यात आली आहे. तसेच ही कार 68hp, 1.0-लीटर पेट्रोल इंजिन आणि 5 स्पीड AMT गियरबॉक्ससह येते. एस-प्रेसो 21.7 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.

ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso) या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच ही कार सुरक्षित नसल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत एस-प्रेसो ही कार पूर्णपणे नापास झाली आहे. गाडीमध्ये केवळ चालकाच्या बाजूला एअरबॅग देण्यात आली आहे. गाडीमध्ये एअरबॅगचं किती महत्त्व आहे, ही बाब सगळेच जाणतात. तरीदेखील कंपनीने गाडीतील इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार केलेला दिसत नाही.

Maruti Suzuki Wagon R

या कारमध्ये 1.2 लीटर क्षमतेचे 4 सिलेंडर इंजिन आहे, ज्यामुळे 82 Bhp पावर आणि 113 Nm चा टॉर्क जनरेट होऊ शकते. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटिक गिअरबॉक्स आहे. ही कार हायब्रिड पावरट्रेनसह सादर करण्यात आलेली आहे. ही कार 21.79 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते. 1 लीटर इंजिन व्हेरिअंटमध्ये नवीन वॅगन आरची किंमत 5.48 लाख रुपये ते 6.18 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच 1.2 लीटर व्हेरिअंटमध्ये या कारची किंमत 5.89 लाख रुपये ते 6.69 लाख रुपयापर्यंत आहे. नवीन वॅगन आर हार्टटेक प्लॅटफॉर्मवर विकसित आणि तयार करण्यात आली आहे. हा प्लॅटफॉर्म सेफ्टी नियमांना अनुरुप आहे. नव्या कारमध्ये बोल्ड डिझाईन, मोठी केबिन आहे.

Datsun Go

Datsun Go ही सीव्हीटी ऑटोमॅटिकसह भारतातील सर्वात स्वस्त हॅचबॅक कार आहे. ही कार 77hp, 1.2-लिटर इंजिनसह येते. तथापि, गुणवत्तेच्या बाबतीत ही कार अद्याप तिच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागे आहे. प्लस साइडमध्ये, गो सीव्हीटी ही इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलसह भारतात उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त कार आहे. डॅटसन गो या कारची किंमत 6.31 लाख रुपये ते 6.51 लाख रुपये इतकी आहे. ही कार 19.59 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.

Hyundai Santro

Hyundai Santro कार 69hp, 1.1-लीटर पेट्रोल इंजिनसह सादर करण्यात आलेली उत्तम कार आहे. या कारची किंमत 5.63 लाख रुपये ते 6.35 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही कार 20.3 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.

इतर बातम्या

शानदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 2 लाखात

मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर कार, किंमत 4 लाखांहून कमी, ‘या’ आहेत टॉप 4 कार्स

VIDEO | कशी होते गाड्यांची Crash Test? कारच्या प्रत्येक पार्टची चाचणी

(Santro, WagonR, Tiago, S-Presso are most affordable automatic hatchback cars with mileage up to 23 km)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI