AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शानदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 2 लाखात

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.

शानदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 2 लाखात
Maruti Suzuki Alto 800
| Updated on: Apr 18, 2021 | 11:38 PM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bumper offer buy Maruti Suzuki Alto 800 LXI in just rs 200000 know more about it)

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी एक अशी सुविधा प्रदान करते ज्याद्वारे तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत.

2017 चं पेट्रोल मॉडल

मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही मारुतीच्या अनेक सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता. आज आम्ही तुम्हाला Maruti Suzuki Alto 800 LXI या कारबद्दल माहिती देणार आहोत. ही एक रिफर्बिश्ड कार असून 20187 चं मॉडल आहे. ही एक पेट्रोल इंजिनवाली कार असून आतापर्यंत 81061 किलोमीटरपर्यंत धावली आहे.

4 लाखांची कार 2 लाखात

या मॉडेलचा रंग व्हाईट असून ही कार खरेदी करताना तुम्हाला मॅनुअल ट्रान्समिशनदेखील मिळेल. या कारची मूळ किंमत 4.14 लाख रुपयांपेक्षा जास्त असून असून ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही ही कार 2 लाख रुपयांमध्ये खरेदी करु शकता. ही सेकेंड हँड Maruti Suzuki Alto 800 LXI www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही कंपनीच्या टॉप सेलिंग कार्सपैकी एक आहे.

टेस्ट ड्राईव्ह बुक करा

या लिंकवर (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/alto-800-in-shimla-2017/AXi6Vqy_NiwKO4z0Jyga) जाऊन तुम्ही या कारबाबतची माहिती घेऊ शकता. सोबतच वेबसाईटवर या कारच्या डीलरचा पत्तादेखील मिळेल. सोबतच तुम्ही वेबसाईटद्वारे या कारची टेस्ट ड्राईव्हदेखील बुक करु शकता.

Maruti Alto 800 चे फीचर्स

मारुती सुझुकीच्या Alto 800 या कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनसह 796cc चं इंजिन मिळेल. हे इंजिन 6000 आरपीएमवर 47.3bhp पॉवर आणि 3500 आरपीएमवर 69Nm टॉर्क जनरेट करते. कारला प्रति लीटर 22.05 किलोमीटरचे मायलेज मिळते आणि या कराची एक्स-शोरूम किंमत 4.14 लाख रुपये इतकी आहे.

अनेक पर्याय उपलब्ध

मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाईटवर अशा बर्‍याच सेकेंड हँड मोटारी पाहायला मिळत आहेत, ज्या तुम्ही तुमच्या बजेटनुसार पडताळून पाहू आणि खरेदी करू शकता.

(सूचना : या बातमीत संबंधित कारबद्दल दिलेली माहिती ही मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर अथवा कारच्या मालकाशी संपर्क साधावा.)

इतर बातम्या 

मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर कार, किंमत 4 लाखांहून कमी, ‘या’ आहेत टॉप 4 कार्स

VIDEO | कशी होते गाड्यांची Crash Test? कारच्या प्रत्येक पार्टची चाचणी

(bumper offer buy Maruti Suzuki Alto 800 LXI in just rs 200000 know more about it)

अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील.
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली.
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे.
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र.
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले.
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर.
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका.
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान.
'हर हर महादेव'च्या जयघोषात घृष्णेश्वरचा मंदिर परिसर दुमदुमूला
'हर हर महादेव'च्या जयघोषात घृष्णेश्वरचा मंदिर परिसर दुमदुमूला.
शिवरायांशी टिपू सुलतानची तुलना! हर्षवर्धन सपकाळ वादाच्या भोवऱ्यात
शिवरायांशी टिपू सुलतानची तुलना! हर्षवर्धन सपकाळ वादाच्या भोवऱ्यात.