VIDEO | कशी होते गाड्यांची Crash Test? कारच्या प्रत्येक पार्टची चाचणी

भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करु लागले आहेत.

VIDEO | कशी होते गाड्यांची Crash Test? कारच्या प्रत्येक पार्टची चाचणी


मुंबई : भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात. त्यामुळे अधिकाधिक सुरक्षित गाड्या ग्राहकांना मिळाव्यात, यासाठी सरकारही सातत्याने नवनवे नियम लागू करत आहे. अलीकडेच सरकारने सर्व वाहन उत्पादकांना ड्रायव्हरच्या सीटसाठी एअरबॅग देण्याचे आदेश दिले आहेत. (How Global NCAP Crash Test done? Cars enters in market only after testing each part, watch video)

सेफ्टी रेटिंग कोणत्याही कारसाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. ग्राहक जसे कारच्या इतर फीचर्समुळे प्रभावित होतात, त्याचप्रमाणे सेफ्टी रेटिंगकडे पाहूनदेखील ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं जातं. त्यामुळे सेफ्टी रेटिंगकडे लक्ष देणं कंपन्यांसाठी महत्त्वाचं आहे. ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso) या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं आहे. तेव्हापासून NCAP क्रॅश टेस्टविषयी देशात चर्चा सुरु आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का क्रॅश टेस्ट म्हणजे नेमकं काय आणि ही टेस्ट कशी केली जाते? चला तर मग जाणून घ्या ही संपूर्ण प्रोसेस.

NCAP क्रॅश टेस्ट कशी असते?

या टेस्टअंतर्गत कार किती सुरक्षित आहे, हे तपासले जाते. यासाठी NCAP चार महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन चाचणी करते. ज्यामध्ये कारमध्ये बसलेले प्रौढ सुरक्षित आहेत का? कारमध्ये बसलेली मुले किती सुरक्षित आहेत, ही कार रस्त्यावर किती सुरक्षितपणे चालते? कंपनीने या कारमध्ये किती आणि कोणते सेफ्टी फीचर्स दिले आहेत. याबाबतची तपासणी केली जाते.

सर्वात आधी फिजिकल क्रॅश टेस्ट केली जाते. ज्यामध्ये गाडी कोणत्याही बाजूने धडकली अथवा, गाडीवर काही आदळलं, तर आत बसलेल्या लोकांना त्याचा किती त्रास होईल हे तपासले जाते. 2020 पासून यामध्ये 7 प्रकारच्या क्रॅश टेस्ट केल्या जात आहेत. ज्यामध्ये फ्रंटल ऑफसेट टेस्ट, फुल विड्थ फ्रंटल टेस्ट, साइड इफेक्ट टेस्ट, फार-साइड इम्पॅक्ट टेस्ट, पेडेस्ट्रन प्रोटेक्शन, ऑब्लिक पोल टेस्ट आणि व्हिप्लॅश टेस्टचा समावेश आहे.

परफॉरमन्स टेस्ट दरम्यान कारची इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन सपोर्ट सिस्टिम, ऑटोमॅटिक इमरजन्सी स्टीयरिंग आणि स्पीड असिस्ट सिस्टम कशी आहे? याची तपासणी केली जाते. यासह इतर गोष्टींचीही तपासणी केली जाते.

टेस्टनंतर रेटिंग दिलं जातं

क्रॅश अँड सेफ्टी टेस्टनंतर NCAP कडून कारला रेटिंग दिलं जातं. त्यातही प्रामुख्याने चाईल्ड प्रोटेक्शनच्या बाबतीत कार किती सुरक्षित आहे. किंवा इतर फीचर्सच्या बाबतीत कारच्या सुरक्षिततेबाबत अहवाल सादर केला जातो. जगभरातील कार्सच्या सेफ्टी क्रॅश टेस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या Global NCAP कडून भारतात अनेक कार्सची टेस्ट केली जाते. त्यानंतर संबंधित कारला सर्टिफिकेट दिलं जातं.

Global NCAP च्या भारतासाठी सुरक्षित कार या अभियानाने भारत सरकार आणि भारतीज बाजारातील वाहन निर्मात्यांचे डोळे उघडण्याचं काम केलं आहे. या अभियानाची सुरुवात 2014 मध्ये करण्यात आली होती. त्यामुळेच सरकारने वाहनांच्या सुरक्षेवर जोर दिला आणि देशात विकळ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी सुरक्षिततेबाबत सरकारने नियम बनवले व त्याची कडक अंमलबजावणीदेखील सुरु झाली.

संबंधित बातम्या

तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

भारतीयांच्या मनात भरलेली Nissan Magnite क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?

15 वर्षांपासून भारतीय मार्केटवर राज्य करत असलेली ‘ही’ कार क्रॅश टेस्टमध्ये फेल

Crash Test : क्रॅश टेस्टमध्ये मारुती, टाटा आणि महिंद्राच्या ‘मेड इन इंडिया कार’ पास की नापास?

(How Global NCAP Crash Test done? Cars enters in market only after testing each part, watch video)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI