AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतीन पटेलचं घर जमीनदोस्त; संजय शिरसाटांचा मोठा दावा –निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच सांगितलं....

मतीन पटेलचं घर जमीनदोस्त; संजय शिरसाटांचा मोठा दावा –निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच सांगितलं….

| Updated on: May 13, 2026 | 1:07 PM
Share

नाशिकमधील प्रसिद्ध आयटी कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मतीन पटेल यांच्या कथित अनधिकृत घर आणि दुकानावर बुलडोझर कारवाई करत बांधकाम जमीनदोस्त केले. या कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मंत्री संजय शिरसाट यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, “मतीन पटेल यांचे घर आणि दुकान पूर्णपणे अनधिकृत होते. प्रशासनाने यापूर्वी नोटीस बजावली होती. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.”
दरम्यान, इम्तियाज जलील यांनी कारवाईनंतर मतीन पटेल यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना पुन्हा घर बांधून देण्याचे आश्वासन दिल्याचा उल्लेख करत शिरसाट यांनी त्यांच्यावर टीका केली. “हे आरोपींचे उघड समर्थन आहे,” असे ते म्हणाले.
निदा खान प्रकरणावरूनही शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांना थेट लक्ष्य केले. “संपूर्ण महाराष्ट्र पोलीस ज्या निदा खानचा शोध घेत होते, तिला मुंब्र्याहून संभाजीनगरमध्ये आणून 35 दिवस लपवून ठेवण्यात आले. यामागे इम्तियाज जलील यांची भूमिका असल्याचा गंभीर संशय आहे,” असा दावा त्यांनी केला. तसेच, “त्या नगरसेवकाचा यात काहीही रोल नाही, त्याला या प्रकरणात ओढण्यात आले,” असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.

Published on: May 13, 2026 01:07 PM
Follow Us