मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ शस्त्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले आहे. मात्र ही शस्त्रक्रिया नेमकी कोणत्या आजारासंदर्भात आहे,
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ शस्त्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले आहे. मात्र ही शस्त्रक्रिया नेमकी कोणत्या आजारासंदर्भात आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या विशेष देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समोर आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नेते त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत असल्याचे समजते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालय हे देशातील अत्याधुनिक आणि नामांकित रुग्णालयांपैकी एक मानले जाते. डॉक्टरांनी किंवा इतर संबंधितांना अजून कोणतीही माहिती दिलेली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून अद्याप अधिकृत निवेदनही जारी करण्यात आलेले नसले तरी लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: May 13, 2026 11:47 AM
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

