राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार… लवकरच महाभूकंप, रोहित पवार यांच्या विधानाने खळबळ, तटकरे, पटेल आणि ते 22 आमदार कोण?
अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आसाम दौऱ्यावर होत्या, त्यावेळी प्रफुल पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा पवारांबरोबर प्रवास करणं टाळलं. यादरम्यान राष्ट्रवादीतील एका यादीत या दोन्ही नेत्यांची नावे नव्हती. या सर्व पार्श्वभूमीवर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. याच प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.
अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आसाम दौऱ्यावर होत्या, त्यावेळी प्रफुल पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा पवारांबरोबर प्रवास करणं टाळलं. यादरम्यान राष्ट्रवादीतील एका यादीत या दोन्ही नेत्यांची नावे नव्हती. या सर्व पार्श्वभूमीवर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. याच प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. त्यातच राज्याच्या राजकारणात काही वेगवान घडामोडी घडल्याने मोठा राजकीय भूकंप होणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्यकारणीतील नेते प्रफुल पटेल यांच्याविषयी आमदार रोहित पवार म्हणाले, ‘सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार आणि तिथून विधानसभेची निवडणूक लढवणार असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे त्यांचा विषय आहे, पण त्या पक्षात अनेक नेते आहेत. कुणाचे नाव घेतले नाही आणि त्यामुळे कोणी दुखावत असेल, सकाळी धाडसी निर्णय आणि नंतर ट्वीट करून त्यात बदल करू असे म्हटले जात असेल, तर हा त्या पक्षाचा विषय असल्याचे रोहित पवार यांनी अजित पवार राष्ट्रवादीतील घडामोडींवर म्हटले आहे. त्याचवेळी तटकरे, पटेल आणि 22 आमदार हे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा त्यांनी केला.’ रोहित पवारांच्या या वक्तव्यानंतर अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.
Published on: May 13, 2026 01:15 PM
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या

