AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधील विद्यार्थी, राहुरीचा डॉक्टर, पुण्याची एजंट अन्…; नीट पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात, आतापर्यंत किती जण ताब्यात?

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय आणि पुणे पोलिसांची मोठी कारवाई. राहुरीच्या धनंजय लोखंडेनंतर आता पुण्यातून मनीषा वाघमारे या महिलेला अटक करण्यात आली असून, धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

नाशिकमधील विद्यार्थी, राहुरीचा डॉक्टर, पुण्याची एजंट अन्...; नीट पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात, आतापर्यंत किती जण ताब्यात?
Neet exam
| Updated on: May 13, 2026 | 2:45 PM
Share

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (NEET) परीक्षा सध्या पेपरफुटीच्या वादाने संपूर्ण देशात गाजत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी केंद्र सरकारने सीबीआयकडे (CBI) सूत्रे सोपवल्यानंतर आता महाराष्ट्रात मोठ्या कारवाई केल्या जात आहेत. नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. आता याच साखळीचा भाग असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

डॉक्टर तरुण संशयाच्या फेऱ्यात

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणाचा दुसरा महत्त्वाचा संशयित म्हणून धनंजय निवृत्ती लोखंडे (२६) याला ताब्यात घेतले आहे. धनंजय हा राहुरी तालुक्यातील माहेगाव-महाडूक सेंटर येथील मूळ रहिवासी आहे. धनंजयने कर्नाटक राज्यातील मंगळूर येथून बी.ए.एम.एस. (B.A.M.S.) चे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तो पुण्यातील वाघोली परिसरात वास्तव्यास होता.

तो अधिकृतरीत्या पुण्यात वैद्यकीय प्रॅक्टिस आणि मेडिकल ॲडमिशनसाठी कन्सल्टिंगचे काम करतो. मात्र, याच कामाच्या नावाखाली तो पेपरफुटीतील रॅकेटशी जोडला गेल्याचा सीबीआयला दाट संशय आहे. त्याचे वडील एका शाळेत लिपिक (क्लार्क) म्हणून कार्यरत आहेत, तर त्याचा मोठा भाऊ देखील डॉक्टर आहे. धनंजय क्वचितच आपल्या गावी जातो.

पुणे पोलिसांची धडक कारवाई

तर दुसरीकडे अहिल्यानगरमधील कारवाईचे पडसाद पुण्यातही उमटले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज पहाटे मनीषा वाघमारे नावाच्या महिलेला ताब्यात घेतले. मनीषा ही पुण्यात ब्युटी पार्लर चालवते. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ती धनंजय लोखंडेच्या संपर्कात होती. पेपर मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोपी धनंजयपर्यंत पोहोचवण्याचे काम एजंट म्हणून ती करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तिच्याकडून एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे. या उपकरणांमध्ये धनंजय आणि मनीषा यांच्यातील संशयास्पद व्हॉट्सॲप कॉल्स आणि मेसेजेसचे रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले आहेत. तिला आज सायंकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात दिले जाणार आहे.

धनंजयला ताब्यात घेतल्याची बातमी समजताच राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्याच्या नातेवाईकांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला असला, तरी ‘ऑफ द रेकॉर्ड’ चर्चा करताना सांगितले की, धनंजय असा काही प्रकार करेल असे वाटत नाही. त्याला या प्रकरणात कोणीतरी जाणीवपूर्वक अडकवले असावे. कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल अनभिज्ञता व्यक्त केली आहे.

पोलिसांची संयुक्त कारवाई

दरम्यान सीबीआय आता धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्या माध्यमातून या रॅकेटमधील मास्टरमाइंड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. पुण्यातील वाघोली परिसर आणि अहमदनगरमधील नेटवर्कचा वापर करून किती विद्यार्थ्यांना हा पेपर पुरवण्यात आला, तसेच यासाठी किती पैशांची देवाणघेवाण झाली, याचा तपास आता सीबीआय आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त मोहिमेतून केला जात आहे.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...