AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीयांच्या मनात भरलेली Nissan Magnite क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?

शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक या गाडीला पाहायला आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे.

भारतीयांच्या मनात भरलेली Nissan Magnite क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 04, 2021 | 2:15 PM
Share

नवी दिल्ली : भारतात गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हींना चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्या भारतीयांची मागणी आणि पसंती लक्षात घेत गाड्या डिझाईन करुन भारतीय मार्केटमध्ये लाँच करत आहेत. निसान कंपनीने 3 डिसेंबर रोजी Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच केली होती. ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. (Nissan Magnite SUV passes crash test with 4-Star ASEAN NCAP rating)

या नव्या मॅग्नाईटने ASEAN NCAP मध्ये नुकतीच तिची पहिली क्रॅश टेस्ट दिली. ज्यामध्ये ही कार पास झाली आहे असं म्हणावं लागेल. कारण या क्रॅश टेस्टमध्ये मॅग्नाईटला 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. क्रॅश टेस्टबाबत NCAP म्हटलं आहे की, निसानच्या या 2020 च्या मॉडेलने सहजपणे क्रॅश टेस्ट पास केली आहे आणि आम्ही त्याचा रिपोर्ट लवकरच सादर करु.

मॅग्नाईटसाठी 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड

दरम्यान, लाँचिंगनंतर अवघ्या 15 दिवसात या कारने 15 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता आता अशी माहिती मिळाली आहे की, या कारच्या काही व्हेरियंट्ससाठी इतकी मागणी आहे की, त्या कारसाठी तब्बल 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. याचाच अर्थ या कारला भारतीय मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक ही गाडी पाहण्यासाठी आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे, अशी माहिती दिल्लीतल्या काही डिलर्सनी दिली आहे. या कारच्या टॉप व्हेरियंटला सर्वाधिक मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. (Nissan Magnite waiting period Stretches to 8 months)

कशी आहे मॅग्नाईट?

कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात Nissan Magnite ची सुरूवातीची किंमत 4 लाख 99 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येईल.

निसान मॅग्नाईटच्या सर्व (10) व्हेरियंट्सच्या किंमती

1. Magnite XE – 4.99 लाख रुपये 2. Magnite XL – 5.99 लाख रुपये 3. Magnite XV – 6.68 लाख रुपये 4. Magnite XV Premium – 7.55 लाख रुपये 5. Magnite Turbo XL – 6.99 लाख रुपये 6. Magnite Turbo XV – 7.68 लाख रुपये 7. Magnite Turbo XV Premium – 8.45 लाख रुपये 8. Magnite Turbo XL CVT – 7.89 लाख रुपये 9. Magnite Turbo XV CVT – 8.58 लाख रुपये 10. Magnite Turbo XV Premium CVT – 9.35 लाख रुपये

दोन इंजिनांचा पर्याय

Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc आहे, जे 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे. दुसरं इंजिन 1.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.

या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे.

Nissan Magnite मधील इतर खास फिचर्स

⦁ Nissan Magnite मध्ये Bi Projector LED हेडलँम्प्स देण्यात आले आहेत.

⦁ LED DRL, LED इंडिकेटर

⦁ 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स

⦁ व्हाइस रेकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

‘या’ गाड्यांना टक्कर 

Nissan Magnite मार्केटमध्ये मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza), ह्युंदाई वेन्यू (Hyundai Venue), टाटा नेक्सॉन (Tata Nexon), फोर्ड इकोस्पोर्ट (Ford Ecosport), महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300), टोयोटा अर्बन क्रुझर (Toyota Urban Cruiser), होंडा WR-V (Honda WR-V) आणि नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या किया सोनेट (Kia Sonet) या कारशी थेट टक्कर होत आहे.

हेही वाचा

15 हजार बुकिंग्सनंतर Nissan Magnite चा सर्वात कमी सर्विस कॉस्टचा दावा

देशभरातील कारप्रेमी वाट पाहात असलेली एसयूव्ही 7 जानेवारीला लाँच होणार

(Nissan Magnite SUV passes crash test with 4-Star ASEAN NCAP rating)

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?