गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत मांडलंच, राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर?
अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आसाम दौऱ्यावर होत्या, त्यावेळी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांबरोबर प्रवास करणं टाळलं, असं सांगितलं जात आहे. यावेळी गुवाहाटीचं नाव पुन्हा समोर आलं आहे. गुवाहाटीमध्येच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत मांडलं, असं वृत्त आहे.

सुनेत्रा पवार यांच्यासमोर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी नाराजी बोलून दाखवली असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याच्या चर्चांनंतर नाराजी व्यक्त होत असल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नाही, तर आणखी एक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत संबंधित प्रकरणाबाबत बोलणं झालं आहे. या भेटीत यादी कोणी बनवली, असा सवाल पटेल आणि तटकरेंनी केला, अशी सूत्रांची माहिती आहे. एकूणच या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आलंय का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
Published on: May 13, 2026 02:38 PM
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी