जाणून घ्या मे महिन्यातील महत्त्वाच्या पाच बदलांबाबत; ज्यामुळे होऊ शकतो तुमच्या बजेटवर परिणाम

| Updated on: May 01, 2022 | 11:24 AM

आज एक मे आहे, नव्या महिन्याला सुरुवात झाली आहे. मात्र या महिन्यात काही बदल देखील करण्यात आले आहेत. जे बदल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. चला तर जाणून घेऊयात नव्या पाच बदलांबाबत

जाणून घ्या मे महिन्यातील महत्त्वाच्या पाच बदलांबाबत; ज्यामुळे होऊ शकतो तुमच्या बजेटवर परिणाम
Follow us on

मुंबई : आजपासून मे (May) महिन्याला सुरुवात झाली आहे. आज मे महिन्याचा पहिला दिवस आहे. नव्या महिन्यात काही महत्त्वाचे बदल पहायला मिळत असून, हे बदल तुमच्या बजेटवर (budget) निश्चितपणे परिणाम करू शकतात. आज आपण या बदलांबाबत जाणून घेणार आहोत. आजपासून पूर्वांचल एक्सप्रेसवेवर (Purvanchal Expressway toll) टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. पूर्वांचल एक्सप्रेस वे हा उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊला गाजीपूरला जोडतो. हा एक्सप्रेस वे तब्बल 340 किलोमिटर लांब आहे. या एक्सप्रेस वेवर प्रति किलोमीटर 2.45 रुपये प्रति किलोमिटर दराने टॅक्सची वसुली केली जाऊ शकते. या एक्सप्रेस वे वर टोलमध्ये 25 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. तरी देखील तुम्हाला या एक्सप्रेस वे वरून प्रवास करायचा असल्यास 625 रुपये मोजावे लागणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक होती. विधानसभेच्या निवडणुकीमुळे आतापर्यंत या एक्सप्रेसवेला टोल फ्री ठेवण्यात आले होते. मात्र आता आजपासून टोल वसुलीला सुरुवात झाली आहे.

आयपीओसाठी युपीआयच्या लिमिटमध्ये वाढ

मार्केट रेग्युलेटर सेबीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आजपासून आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी युपीआयच्या पेमेंट लिमिटमध्ये वाढ करण्यात आली आहे. नवा नियम आजपासून लागू झाला आहे. आता तुम्ही युपीआयच्या माध्यमातून आयपीओमध्ये पाच लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. पूर्वी ही लिमिट दोन लाख रुपये इतकी होती.

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात वाढ

पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा झटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यवसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरचे दर 268. 50 रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यामध्ये आता पुन्हा एकदा 104 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. व्यवसायिक सिलिंडर 104 रुपयांनी महागला असून, आजपासून नवे दर लागू झाले आहेत.

जेट फ्यूलच्या दरात वाढ

आज केवळ व्यवसायिक सिलिंडरच नव्हे तर जेट फ्यूलच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एटीएफच्या दरात सातत्याने वाढ होत असून, नव्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये जेट फ्यूलचे दर 116851.46 रुपये किलोलिटरवर पोहोचले आहेत. तर मुंबईमध्ये जेट फ्यूलचे दर प्रति किलोलिटर 115617.24 इतके आहेत. जेट फ्यूलचे दर वाढल्यामुळे विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे.

मे महिन्यात बँकांना अकरा दिवस सुटी

मे महिन्यात बँकांना तब्बल अकार दिवस सुटी आहे. त्यामुळे बँका अकरा दिवस बंद राहणार आहेत. तुमचे काही महत्त्वाचे काम असेल तर ते आजच उरकून घ्या या सुट्यांमध्ये आज एक मे कामगार दिनाच्या सुटीसह रविवार आणि शनिवारच्या सुट्यांचा समावेश आहे.