AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO | पीएफ खात्यातून रक्कम काढायचीये, ई-नॉमिनेशन केलं का?

EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पीएफ खात्यात ई-नॉमिनेशन प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया करणे अत्यंत सोपे आहे.

EPFO | पीएफ खात्यातून रक्कम काढायचीये, ई-नॉमिनेशन केलं का?
ई-नॉमिनेशनची सोपी प्रक्रियाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 13, 2022 | 3:45 PM
Share

EPFO | पीएफ खातेदाराला ई-नॉमिनेशन (e-nomination) करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही ई-नॉमिनेशन केलं नसेल तर तुम्हाला पीएफ खात्यातून (PF Account) रक्कम काढता येत नाही. तसेच तुम्हाला खात्यातील बँलन्सही (Balance) तपासता येत नाही. ई-नॉमिनेशनची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. ती तुम्हाला ऑनलाईन पूर्ण करता येते.

सामाजिक सुरक्षा मिळणार नाही

पीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास, खातेदाराच्या वारसांना, कुटुंबियांना ई-नॉमिनेशनअतंर्गत सामाजिक सुरक्षा मिळते. त्यावर दावा सांगताना मोठ्या अडचणी येऊ शकतात.

ई-नॉमिनेशन बंधनकारक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) खातेदारांना वारसांची माहिती देण्यासाठी ई-नाॉमिनेशनची सुविधा देण्यात येते. पीएफ खातेदाराने ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ऑनलाईन क्लेम करणे सोपे

खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिय सामाजिक सुरक्षा योजनेतंर्गत दावा दाखल करु शकतात. तसेच पीएफ खात्यातील रक्कम काढणे त्यांना सोपे होते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करता येते.

7 लाख रुपयांची मिळते सुविधा

EPFO सदस्यांना विम्याचेसंरक्षण मिळते. एम्पलॉई डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम( EDLI Insurance Cover) अंतर्गत विमा कवच मिळते. या विमा योजनेत वारसदाराला 7 लाख रुपयांपर्यंतची विमा सुरक्षा मिळते.

तर कोर्टात धाव

जर विना वारसदार पीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास, दाव्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात. न्यायालयात दाद मागावी लागते.

अशी आहे प्रक्रिया

खातेधारकाने ईपीएफओच्या www.epfindia.gov.in  या  संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर खातेधारकांनी  ‘Service’ हा पर्याय निवडावा ‘For Employees’ या पर्यायवर क्लिक करावे आता तुमचा UAN हा क्रमांक तयार ठेवा. तो तुम्हाला सॅलरी स्लीप वर (Salary Slip) सापडेल ‘Member UAN/Online Service (OCS/OTCP)’ येथे क्लिक करा तुम्ही लॉगिन करानॉमिनी जोडण्यासाठी  ‘Manage’ पर्याय निवडा त्यात  ‘E-Nomination’ पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करा family declaration हा पर्याय निवडा ‘Add Family Details’ काळजीपूर्वक, विचारपूर्वक भरा ‘Nomination Details’ हा कॉलम भरा ‘Save EPF Nomination’ हा पर्याय निवडा. ‘E-sign’ निवडीनंतर ओटीपी (OTP) येईल. ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर तुमच्यानॉमिनीचे रजिस्ट्रेशन पूर्ण होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.