

कुठे-कुठे होईल टूर? - या पॅकेजमध्ये पुरी, गंगासागर, गया, वाराणसी, प्रयागराज, उज्जैन टूर केल्या जातील. ही सहल 11 रात्री आणि 12 दिवसांची आहे.

किती पैसे लागतील? - तुम्हाला एसी कोचमध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्हाला या सहलीसाठी 13,860 रुपये द्यावे लागतील. त्याचवेळी स्लीपरमधून प्रवास करायचा असेल तर केवळ 11340 रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये तुमची सर्व व्यवस्था आयआरसीटीसी करेल.

ट्रेन कुठून पकडायची? - या सहलीमध्ये राजकोट, सुरेंद्र नगर, विरमगाम, मेहसाना, कलोल, साबरमती, आनंद, चापुरी, गोधरा, दाहोद, रतलाम, नागदा, उज्जैन येथूनही गाड्या पकडता येतील.

कधी सुरू होईल टूर? ही सहल 16 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होणार आहे. आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन आपण ही बुक करू शकता.