Petrol-Diesel Price : ग्राहकांना दिलासा, सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलची किंमत स्थिर, तुमच्या शहरातील दर काय?

| Updated on: Jul 19, 2021 | 6:48 AM

यापूर्वी 5 राज्यांमधील निवडणुकांच्या दरम्यान सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. (Petrol Diesel Price Fuel Rate Today 19 July 2021)

Petrol-Diesel Price : ग्राहकांना दिलासा, सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलची किंमत स्थिर, तुमच्या शहरातील दर काय?
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या  (Petrol Diesel Price Today) दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. इंधनाच्या दरात सतत वाढ होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर हे विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. देशातील बहुतांश शहरात पेट्रोलची किंमत ही 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा दर हा स्थिर आहे. रविवारसह आज सोमवारी (19 जुलै) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशांतर्गत तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवत आहेत. (Petrol Diesel Price Fuel Rate Today 19 July 2021)

मे आणि जूनमध्ये तब्बल 16 वेळा किंमती वाढल्या

जुलै महिन्यात सलग नऊ वेळा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमती या 5 वेळा वाढल्या आहेत. तर एकदा त्यात घट करण्यात आली आहे. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तब्बल 16 दिवस वाढवण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 दिवस वाढवण्यात आल्या. किरकोळ इंधन दरामधील ही दरवाढ 4 मे 2021 पासून सुरू झाली आहे. यापूर्वी 5 राज्यांमधील निवडणुकांच्या दरम्यान सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.

देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल कुठे?

देशभरातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल राजस्थानमधील गंगानगर आणि मध्य प्रदेशातील अनुपपूर या ठिकाणी आढळत आहे. गंगानगरमध्ये आज पेट्रोल 113.21 रुपये आणि डिझेल 103.15 रुपये दराने उपलब्ध आहे. तर अनूपपूरमध्ये आज पेट्रोलची किंमत 112.78 रुपये तर डिझेलची किंमत 101.15 रुपये प्रतिलिटर आहे.

शहर  पेट्रोल (रुपये/लिटर)  डिझेल (रुपये/लिटर)
नवी दिल्‍ली  101.84 89.87
मुंबई 107.83 97.45
कोलकाता 102.08 93.02
चेन्‍नई 102.49 94.39
नोएडा  99.02 90.34
बंगळूरु 105.25 95.26
हैदराबाद 105.83 97.96
पाटणा 104.25 95.51
जयपूर 108.71 99.02
लखनऊ 98.92 90.26
गुरुग्राम 99.46 90.47
चंडीगड 97.93 89.50

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

(Petrol Diesel Price Fuel Rate Today 19 July 2021)

संबंधित बातम्या : 

ATM मधून रंग लागलेली नोट बाहेर आली तर काय करावे? नियम काय सांगतो?

तुमच्या गाडीत 100% शुद्ध पेट्रोल टाकलं जात नाही, ‘या’ गोष्टीची भेसळ! नेमकं नुकसान काय?

बँकांची स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँक 6000 कोटींची बॅड बँक बनवणार, आयबीए देणार आरबीआयकडे अर्ज