पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात का, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Nov 03, 2021 | 12:50 PM

PM Kisan Yojna | पती-पत्नी दोघांनी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत अर्ज केल्यास त्यांना लाभ मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होतो. अशा परिस्थितीत पती-पत्नीपैकी कोणीही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. योजनेचा लाभ फक्त एकाच व्यक्तीला मिळतो.

पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात का, जाणून घ्या सर्वकाही
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना
Follow us on

नवी दिल्ली: तुम्ही PM किसान (PM KISAN) योजनेचे लाभार्थी असाल तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी असू शकते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली. या योजनेंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये (पीएम किसान हप्ता) हस्तांतरित केले जातात. आतापर्यंत 9 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले गेले आहेत, लवकरच 10वा हप्ता (PM किसान 10वा हप्ता) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

पती-पत्नी दोघांनी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत अर्ज केल्यास त्यांना लाभ मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होतो. अशा परिस्थितीत पती-पत्नीपैकी कोणीही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. योजनेचा लाभ फक्त एकाच व्यक्तीला मिळतो. जर दोघांनी अर्ज केला असेल. जर मदतीच्या रकमेचा लाभ मिळाला असेल तर पती-पत्नीपैकी एकाला पैसे परत करावे लागतील.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो योजनेचा फायदा?

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, ज्यांच्याकडे दोन हेक्टर म्हणजे 5 एकर लागवडीयोग्य शेती आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळतो. आता सरकारने धारण मर्यादा रद्द केली आहे. शेतीयोग्य जमीन कोणाच्या नावावर आहे, त्यांना पैसे मिळतात, पण जर कोणी आयकर रिटर्न भरला तर त्याला पीएम किसान सन्मान निधीतून बाहेर ठेवले जाते.

पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता कधी मिळणार?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या दहाव्या हप्त्याअंतर्गत 15 डिसेंबर 2021 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये येणे अपेक्षित आहे. मात्र, मोदी सरकारने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला PM किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणी (PM KISAN Registration) करावी लागेल.

पंतप्रधान किसान योजनेच्या नियमांत बदल

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ही योजना सुरु झाल्यापासून अनेक बोगस शेतकरी योजनेचे पैसे लाटत असल्याचा प्रकार समोर आला होता. हा गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या नियमांत काही बदल केले आहेत.
नव्या नियमांनुसार, केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी रेशनकार्ड अनिवार्य केले आहे. त्यानुसार लाभार्थी कुटुंबांना आपल्या रेशनकार्डसह आधार कार्ड, बँक पासबूक आणि PM-KISAN संकेतस्थळावरील घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे जमा करावी लागतील.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांना आता विनातारण 1.60 लाखांचे कर्ज मिळणार, जाणून घ्या सर्वकाही

योजना शेतकऱ्यांच्या हिताची : प्लास्टिक मल्चिंगचे महत्व अन् 50 टक्के अनुदानाचा ‘असा’ घ्या लाभ…!

अनियमितता टाळण्यासाठी पीएम किसान योजनेत अणखीन बदल, अन्यथा मिळणार नाहीत पैसे