Post Office | पोस्टाच्या योजनेत दरमहा कमाई.. व्याजही मिळेल चांगले..

| Updated on: Sep 23, 2022 | 7:42 PM

Post Office | पोस्टाच्या या योजनेत केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरेल. एकदा गुंतवणूक केली तर तुम्हाला महिन्याला चांगली कमाई होईल..

Post Office | पोस्टाच्या योजनेत दरमहा कमाई.. व्याजही मिळेल चांगले..
पोस्टाच्या योजनेत कमाई
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : जर तुम्ही एकदाच गुंतवणूक करुन दरमहा चांगले उत्पन्न मिळवू इच्छित असाल तर पोस्ट कार्यालयाची (Post Office Scheme) ही योजना तुमच्यासाठी आहे. पोस्टातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित(Secure) मानण्यात येते. त्यातच गुंतवणुकीवर व्याजही (Interest)मिळत असल्याने तुमचा फायदा होतो.

पोस्ट खात्याच्या मंथली इन्कम स्कीममध्ये (Monthly Income Scheme) गुंतवणूक करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. ही एक अल्पबचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही दर महिन्याला एक निश्चित उत्पन्न मिळवू शकता. ही एक प्रकारची पेन्शन स्कीम आहे. त्यात एकरक्कमी गुंतवणूक करावी लागते.

पोस्ट खात्याची ही मंथली इन्कम स्कीम पाच वर्षांकरीत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही ही योजना पुढे पाच -पाच वर्षांकरीता वाढवू ही शकता. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गुंतवलेली राशी परत मिळते. या योजनेवर सध्या 6.6 टक्के वार्षिक व्याज देण्यात येते. ही योजना पाच वर्षांत मॅच्युअर होते.

हे सुद्धा वाचा

या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला तुम्हाला ठरलेली रक्कम प्राप्त होईल. या योजनेत जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते. या योजनेतंर्गत तुम्ही संयुक्त खातेही उघडू शकता. त्यानुसार तुम्हाला 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.1000 रुपयांनीही तुम्ही या योजनेत खाते उघडू शकता.

जर तुम्ही या योजनेत 4.5 लाख रुपये गुंतवणूक करत असाल, तर 6.6 टक्के वार्षिक व्याजाने तुम्हाला पाच वर्षांत 29,700 रुपये मिळतील.तुम्हाला ही रक्कम दरमहिन्याला घ्यायची असेल तर तुम्हाला महिन्याला 2475 रुपये मिळतील.

संयुक्त खाते असेल तर तुम्हाला 9 लाख रुपये गुंतवावे लागतील. पाच वर्षे यावर व्याजाची रक्कम जमा होईल. पाच वर्षांत ही रक्कम 59,400 रुपये होईल. दर महिन्याचा विचार करता, तुम्हाला संयुक्त खात्यात 4950 रुपयांची कमाई होईल.