Government : धान्यासोबत आता निःशुल्क उपचार, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन, कोणाला फायदा मिळणार..

| Updated on: Oct 28, 2022 | 7:33 PM

Government : या गरीब लोकांसाठी आता सरकारने निःशुल्क उपचाराची योजना आणली आहे.

Government : धान्यासोबत आता निःशुल्क उपचार, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन, कोणाला फायदा मिळणार..
रेशन सोबत मोफत उपचार
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे रेशन कार्ड (Ration Card) असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच. कारण आता रेशन कार्डवर राशनसोबतच मोफत उपचाराची (Free Health Treatment) ही सोय होणार आहे. केंद्र सरकारने (Central Government) यासाठी अभिनव योजना आणली आहे. पण ही योजना सरसकट सर्वच रेशन कार्डधारकांना लागू नसेल.

केंद्र सरकारने अंत्योदय कार्डधारकांसाठी (Antyodaya Ration Card) ही योजना सुरु केली आहे. त्यानुसार, त्यांना अन्नधान्य तर मिळेलच पण आता त्यांच्या आरोग्याची ही सरकार काळजी घेईल. कार्डधारकासह त्याच्या कुटुंबियांना निःशुल्क उपचाराची सोय करण्यात येणार आहे.

अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी (Antyodaya Ration Card) केंद्र सरकार लवकरच आयुष्यमान कार्ड तयार करणार आहे. त्यामुळे त्यांना मोफत आरोग्य सोयी-सुविधा मिळविता येतील. तसेच त्यांना असाध्य आजारांसाठीही मदत मिळेल.

हे सुद्धा वाचा

यासाठी प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर लवकरच अभियान राबविण्यात येणार आहे. त्यातंर्गत अंत्योदय कार्ड धारकांच्या कुटुंबिय, सदस्यांचे आयुष्यमान कार्ड तयार करण्यात येईल.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारला अंत्योदय कार्डधारकांना (antyodaya ration card) आयुष्यमान कार्ड तयार करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. आता इतर ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने आयुष्यमान कार्ड तयार करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. या अभियानातंर्गत आता अंत्योदय कार्ड धारकांना आयुष्यमान कार्ड तयार करुन देण्यात येणार आहे.

ज्या अंत्योदय कार्ड धारकांकडे सध्या आयुष्यमान कार्ड नाही, त्यांनी संबंधित विभागात जाऊन ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन घेतली तर उलट चांगलेच आहे. आयुष्यमान कार्डधारकांना सरकारी आणि खासगी रुग्णालयात मोफत उपचारांची सुविधा मिळते.

सध्या केंद्र सरकारकडून नवीन आयुष्यमान कार्ड तयार करण्यात येत नाही. ज्या लाभार्थ्यांचे नाव या योजनेत अगोदरच समाविष्ट आहेत, त्यांनाच हे कार्ड तयार करुन देण्यात येत आहे.

दारिद्रय रेषेखालील गरिबांचा अंत्योदय योजनेत समावेश करण्यात येतो. त्यातंर्गत कार्डधारकांना एकूण 35 किलो गहू आणि तांदळाचे वाटप होते.