कच्च्या तेलाच्या वाढत्या भावाचा प्रवाशांना फटका; विमान प्रवास महागला, तिकिटांच्या दरामध्ये 15 ते 30 टक्क्यांची वाढ

| Updated on: Mar 14, 2022 | 1:06 PM

जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये (Summer Vacations) कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन बनवत आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढल्याने (Crude Oil) भारतात विमान प्रवास महाग झाला आहे.

कच्च्या तेलाच्या वाढत्या भावाचा प्रवाशांना फटका; विमान प्रवास महागला, तिकिटांच्या दरामध्ये 15 ते 30 टक्क्यांची वाढ
विमान प्रवास महागला
Follow us on

जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये (Summer Vacations) कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन बनवत आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढल्याने (Crude Oil) भारतात विमान प्रवास महाग झाला आहे. कच्च्या तेलाच्या भावात तेजी असल्याने विमान कंपन्यांनी देशांतर्गत प्रवासाच्या (Domestic Air Fare) तिकिटाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही आठवड्यात देशार्गंत विमानांच्या तिकीटामध्ये 15 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. दरम्यान दुसरीकडे कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आतंराष्ट्रीय विमान उड्डानांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परदेशवारी स्वस्त होऊ शकते असा अंदाज बांधण्यात येत आहे. कोरोना काळात देशाबाहेरील विमान उड्डानासाठी अनेक बंधने घालण्यात आली होती त्यामुळे विमान प्रवास महाग झाला होता.

तिकिटांमध्ये 26 ते 29 टक्क्यांची वाढ

इंडियन एक्प्रेसच्या रिपोर्टनुसार ऑनलाईन तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म इक्सिगो (Ixigo)ने सांगितले की, 25 फेब्रुवारी ते तीन मार्च दरम्यान दिल्ली -ते मुंबई एकावेळच्या प्रवासाचे तिकीट प्रति प्रवासी 5,119 रुपये एवढे होते. मात्र त्यानंतर आता हे तिकीट 26 टक्क्यांनी महागले आहे. याचप्रमाणे कोलकाता ते दिल्ली दरम्यानच्या तिकिटांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. हा प्रवास तब्बल 29 टक्क्यांनी महागला आहे. मात्र दुसरीकडे विमान उड्डानांची सख्या वाढल्याने परदेश प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे.

कच्चे तेलाचे दर 110 डॉलर प्रति बॅरलवर

रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा फटका हा कच्च्या तेलाच्या मार्केटला बसत आहे. रशियामधून मोठ्याप्रमाणात कच्चे तेल निर्यात होते. मात्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इतर युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर निर्बंध घातल्याने कच्चा तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कच्च्या तेलाचे दर झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 130 डॉलरवर पोहोचले होते. मात्र आता दरात काही प्रमाणात घट झाली असून, सध्या कच्च्या तेलाचे दर 110 डॉलर प्रति बॅरल इतके आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने अनेक देशात पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढले आहेत.

संबंधित बातम्या

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा श्रीलंकेला फटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या भारतात काय स्थिती?

टेलिकॉम क्षेत्राचे रुपडे पलटणार; ‘5G’बाबत माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले वैष्णव?

Russia-Ukraine war : भारतीय स्टील उद्योगाची चांदी; निर्यात 76 टक्क्यांनी वाढली