Mosquito : हे भयताड मलेच कायले चावत असेल भौ..मच्छर एखाद्या व्यक्तीवरच का करतात अटॅक..

Mosquito : काही लोकांनाच मच्छर सतत त्रास देतात, त्यांना चावा घेतात..पण असं का?

Mosquito : हे भयताड मलेच कायले चावत असेल भौ..मच्छर एखाद्या व्यक्तीवरच का करतात अटॅक..
मच्छर एखाद्यालाच का सारखे चावतात?
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 21, 2022 | 6:01 PM

नवी दिल्ली : काही लोकांना वाटतं त्यांना मच्छर (Mosquitoes) जास्त त्रास देतात. तर काही लोकांना मच्छरांचा काहीच त्रास होत नाही. त्यांना मच्छर चावतही (Bite) नाहीत. काही लोक मच्छरांबाबत अति संवेदनशील असतात. ते वारंवार तक्रार करतात की, मच्छर त्यांच्या कानाजवळ गूणगूण करतात. तर इतर जणांना त्याचा काहीच त्रास होत नाही.

यामुळे काही लोकांसाठी डास हे चुंबकासारखे (Mosquito Magnets) आकर्षित करतात. नवीन संशोधनाआधारे या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वैज्ञानिकांनी यामागची कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

वैज्ञानिकांच्या मते, काही व्यक्तींच्या शरिरातून एक प्रकारचा गंध (Unique Smell) बाहेर पडतो, ज्यामुळे डास या व्यक्तीकडे आकर्षित होतात. ते सारखे त्याच्याकडे आकर्षिल्या जातात आणि त्याला चावा घेतात.

यापूर्वी रक्त गोड असेल. रक्तात साखर जास्त असेल. लसण अथवा गोड खाल्यामुळे अथवा महिलांनाच मच्छर जास्त चावतात असे गैरसमज होते. या सर्व समजांना या नव्या संशोधनाने फाट्यावर मारले आहे.

त्यामुळे यापुढे जर सातत डास एखाद्याला चावत असेल तर या संशोधनाचा आधार तुम्हाला सांगता येईल. विशिष्ट गंधामुळे मच्छर व्यक्तीकडे आकर्षित होतो आणि त्याला चावतो, एवढं सोप्प हे उदाहरण आहे.

मनुष्याच्या त्वचेतून फॅटी अॅसिड बाहेर पडते. त्याला एकप्रकारचा गंध असतो. त्यामुळे डास त्या व्यक्तीकडे सारखे आकर्षित होतात. हे नवीन संशोधन सेल जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यामुळे यापूर्वीच्या डास चावण्याची सर्व कारणे बाजूला सारली आहे.

ज्याच्या शरिरातून कार्बोक्सिल अॅसिड जास्त प्रमाणात बाहेर पडते, त्या व्यक्तींकडे डास जास्त आकर्षित होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. अशा व्यक्ती डासांसाठी चुंबकासारखे काम करतात.